fbpx

Fighter First Look: बहुप्रतिक्षित ‘फायटर’चा फर्स्ट लूक समोर

Fighter First Look | ‘फायटर’चा फर्स्ट लूक : हृतिक रोशनच्या एरियल अॅक्शन अॅडव्हेंचर फिल्म फायटरचा टीझर रिलीज झाला आहे. दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन यांच्या भूमिका असलेला हा बहुचर्चित ‘फायटर’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. आता स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रेक्षकांची प्रतीक्षा संपवत निर्मात्यांनी फायटरचा टीझर रिलीज केला आहे. काही मिनिटांच्या या टीझरमध्ये ‘फायटर’ चित्रपटातील मुख्य कलाकारांचा फर्स्ट लूक समोर आला आहे आणि त्याच बरोबर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ही सांगण्यात आली आहे. ‘फायटर’ चित्रपटाच्या या टीझरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

स्वांतत्र्य दिनाचे औचित्य साधत टीझर आणला समोर

दीपिका पदुकोणने स्वांतत्र्य दिनाचे औचित्य साधत ‘फायटर’ चित्रपटाचा टीझर व्हिडीओ शेअर केला आहे. याची सुरुवात आकाशात उडणाऱ्या लढाऊ विमानाने होते. त्यानंतर यात सुरुवातीला हृतिक रोशनची झलक पाहायला मिळते. त्यापाठोपाठ दीपिका पदुकोण, अनिल कपूर यांचीही पहिली झलक यात समोर आली आहे.

फायटरचे मोशन पोस्टर अनिल कपूरनेही त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहे. मोशन पोस्टर रिलीज करताना, अभिनेत्याने 15 ऑगस्टच्या शुभेच्छा दिल्या, “वंदे मातरम्. 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संध्याकाळी भेटू.”

हे ही वाचा : OMG 2 ला ‘A’ सर्टिफिकेट दिल्याबद्दल अक्षय कुमारने व्यक्त केली नाराजी

Fighter First Look: चाहते उत्साहित

या आधी काही दिवसांपूर्वी हृतिक रोशनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘फाइटर’चा फर्स्ट लूक शेअर केला होता. तो फायटर जेटजवळ कॅमेऱ्याकडे पाठ करून उभा असल्याने त्या फोटोमध्ये हृतिकचा चेहरा दिसत नव्हता. अभिनेत्याचा चेहरा दिसत नसला तरी, त्याच्या लूकवरून याचा अंदाज लावला जाऊ शकत होता की या चित्रपटात हृतिक खूपच स्मार्ट दिसणार आहे. पण आता प्रकाशित झालेल्या टीजर मध्ये त्याचाही लूक समोर आला आहे.

फायटरमधील हृतिक रोशनचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता, मात्र बाकीच्या स्टारकास्टचे अनावरण करण्यात आले नव्हते. आता ‘फायटर’च्या टीझरमध्ये हृतिक रोशनसोबत दीपिका पदुकोण आणि अनिल कपूरचा लूकही रिलीज करण्यात आला आहे. ‘फायटर’ चित्रपटातील या तिघांचा लूक फारच जबरदस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांचा हा लूक पाहून चाहते त्यांचं कौतुक करताना दिसत आहे.

‘फायटर’ ची स्टारकास्ट

दरम्यान ‘फायटर’ या चित्रपटाची घोषणा १० जानेवारी २०२१ रोजी करण्यात आली होती. त्यानंतर या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करण्यात आली. या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण हे दोघेही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्याबरोबरच या चित्रपटात अनिल कपूरही झळकणार आहेत.

वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, फायटरमध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अनिल कपूर, करण सिंग ग्रोवर आणि तलत अजीज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. फायटरमध्ये हवाई कारवाई पूर्ण होणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करीत आहेत. हा चित्रपट २५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *