Paneer Lolipop : पनीर लॉलीपॉप
Paneer Lolipop : पावसाळ्यात तुम्हालाही काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेलच, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत स्वादिष्ट गरमागरम पनीर लॉलीपॉप (Paneer Lolipop) ची रेसिपी.
पनीर लॉलीपॉप हा अनेकांची आवडती डिश आहे. ही डिश क्रिस्पी, फ्लेवरफुल आणि बनवण्यास अगदी सोप्पी आहे. चला तर मग जाणून घेऊयात या पदार्थासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
Paneer Lolipop : साहित्य
- १ कप पनीर
- २ उकडलेले बटाटे
- २ हिरव्या मिरच्या
- १/२ शिमला मिर्ची
- १ चम्मच आलं
- १ चम्मच लसूण
- १/२ चम्मच जीरा पावडर
- १/२ चम्मच गरम मसाला पावडर
- १/२ चम्मच चाट मसाला
- १/४ वाटी चिरलेली कोथिंबीर
- मीठ स्वादानुसार
- लाल मिर्च पावडर स्वादानुसार
- १ कप ब्रेड क्रंप्स
- १/२ कप मैदा
हे ही वाचा : चविष्ट बासुंदी
Paneer Lolipop : कृती
- एका कटोऱ्यामध्ये किसलेले पनीर घ्या आणि त्यात उकडलेले बटाटे घाला.
- कोथिंबीर, चिरलेली शिमला मिर्च, मीठ, लाल तिखट, जिरेपूड, गरम मसाला, चाट मसाला, आले-लसूण पेस्ट घालून चांगले मिक्स करा.
- १० मिनिटे थांबा आणि नंतर मिश्रणातून लहान गोळे बनवा.
- मैदयाच्या पिठामध्ये ते गोळे मिश्रणामध्ये बुडवा आणि ब्रेडक्रंब्ससह कोट करा.
- कढईत तेल गरम करून त्यात पनीर बॉल घाला, गोल्डन ब्राऊन होईस्तोवर तळा.
- पनीर लॉलीपॉप खाण्यासाठी, एक टूथपिक घाला आणि केचअपसह गरम सर्व्ह करा.