Mahatma Phule Biopic : ‘फुले’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित
Mahatma Phule Biopic : अनेक वर्षे शिक्षणाचा हक्क आणि समानतेसाठी लढा देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या ‘फुले’ या बायोपिक चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित केला आहे. पोस्टरमधील अभिनेता प्रतीक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा यांचा लूक चर्चेचा विषय बनला आहे. चित्रपटातील व्यक्तिरेखांचं पहिला लूक पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढलेली चांगलीच आहे,
Mahatma Phule Biopic : ज्योतिबा आणि सावित्री यांच्या असामान्य कर्तृत्वाची कथा
वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, हा चित्रपट ज्योतिबा आणि सावित्री यांच्या असामान्य कर्तृत्वाची कथा सांगणारा चित्रपट आहे . महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या पत्नीसह असाक्षरता, अस्पृश्यता आणि जातिभेदाच्या विरोधात दीर्घकाळ लढा दिला. त्यासाठी त्यांना सतत्कालीन समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. आता त्यांचा हा संघर्ष ‘फुले’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर उलगडला जाणार आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर, निर्मात्यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लूक अनावरण केला, या फर्स्ट लूकमध्ये प्रतीक आणि पत्रलेखा हुबेहुब महात्मा आणि सावित्री फुले यांच्यासारखे दिसत आहेत.
फुले दाम्पत्याने नेहमीच महिला, दलित आणि मागासलेल्या लोकांच्या समान हक्कांसाठी लढा दिला आणि समाजातील सर्व घटकांना शिक्षण देण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापनाही केली. त्याचबरोबर भारतीय समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. स्त्री शिक्षणासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्री फुले यांनी केलेल्या कार्याचे आजही स्मरण केले जाते.
हे ही वाचा : ‘वेलकम 3’ ची स्टारकास्ट झाली आणखीनच रंजक, चित्रपटात दिसणार आहेत या दोन सुंदरी
अनंत महादेवन यांचे लेखन आणि दिग्दर्शन
‘फुले’ या हिंदी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी केले आहे. त्याचबरोबर प्रतीक गांधी आणि पत्रलेखा सारखे उत्तम कलाकार महात्मा आणि समाजसुधारक आणि समाजसेवक म्हणून प्रसिद्ध असलेल्या सावित्री फुले यांच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
निर्माते सुनील जैन चित्रपटासाठी खूप उत्सुक
चित्रपटाचे निर्माते सुनील जैन या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले, “हा चित्रपट प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्थान निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक असल्याने ही कथा मोठ्या पडद्यावर येणे गरजेचे होते आणि त्या कार्याचा एक भाग झाल्याचा त्यांना अभिमान आहे.”