आंतरराष्ट्रीय श्वान दिन
कुत्रे हे माणसाचे सर्वात चांगले मित्र आहेत हे आपणा सर्वांना चांगलेच माहीत आहे. त्यांचे प्रेम बिनशर्त आहे आणि म्हणूनच त्या आपुलकीचा सन्मान करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय श्वान दिवस दरवर्षी 26 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. लोकांना कुत्रे दत्तक घेण्यास प्रोत्साहित करणे आणि त्यांना त्यांच्या पात्रतेचे चांगले जीवन प्रदान करणे हा देखील यामागचा उद्देश आहे. तुमचा वेळ तुम्ही तुमच्या ह्या जवळच्या प्रेमळ मित्रासाठी द्यावा आणि त्याला अधिक खास वाटू द्यावे ह्या उद्देशाने आजचा दिवस हा आंतरराष्ट्रीय श्वान दिन म्हणून साजरा केला जातो.
हे ही वाचा: ‘या’ 7 जातीचे कुत्रे आहेत पाळण्यासाठी बेस्ट
इतिहास आणि महत्त्व:
पाळीव प्राणी आणि कौटुंबिक जीवनशैली तज्ञ, प्राणी वाचवा मोहिमेचे पुरस्कर्ते, संरक्षक, डॉग ट्रेनर आणि लेखक कॉलीन पायगे यांनी 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय श्वान दिन सुरू केला. 26 ऑगस्ट 2004 रोजी पायगेच्या कुटुंबाने त्यांचा पहिला कुत्रा ‘शेल्टी’ दत्तक घेतला. शेल्टी तेव्हा 10 वर्षांचा होता.
इतकंच नाही तर कोलीन हे राष्ट्रीय पपी डे, नॅशनल कॅट डे आणि नॅशनल वाइल्डलाइफ डेचे संस्थापक आहेत.
आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या चार पायांच्या ह्या मित्रांबद्दल काळजी आणि प्रेम दाखवत असले तरी, असे बरेच लोक त्यांचाशी क्रूरपणे वागतात. आंतरराष्ट्रीय श्वान दिनाच्या निमित्ताने अशा समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि प्रत्येकाला या कुत्र्यांची चांगली काळजी घेण्यासाठी प्रेरित करण्याची संधी देतो.