ॲड.संदीप सुरेश लेले: ठाण्याचे कर्तृत्ववान नेतृत्व
ॲड.संदीप सुरेश लेले हे ठाणे शहरातील कर्तृत्ववान नेत्यांपैकी एक अशी ओळख असणारे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव ॲड.संदीप लेले २५ वर्षांहून अधिक काळ ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तुळात सक्रिय आहेत. सामाजसेवा, युवक संघटन आणि राजकारण या तिन्ही आघाड्यांवर त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप उमटविली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या ‘वंदे मातरम् संघ’ या मंडळानेही आजपर्यंत अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून ठाण्याच्या पाचपाखाडी भागात माघी गणेशोत्सव साजरा करण्याची सुंदर परंपरा त्यांनी सुरू केली, जी आज मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
ॲड.संदीप लेले यांचा जन्म आणि शिक्षण ठाणे शहरात झाला. त्यांचे वडील सामाजिक कार्यात सक्रिय होते आणि त्यांच्यापासूनच संदीप लेले यांना समाजसेवेची प्रेरणा मिळाली. बालपणापासूनच त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार त्यांच्यावर घडले. संघाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेत राहिल्याने राष्ट्रप्रेम, हिंदुत्व आणि भारतीय संस्कृती यांची बीजे त्यांच्या मनात खोलवर रुजली. पुढच्या पिढीतही ही बीजे रुजावी यासाठी त्यांनी धनाजी नाना शाळेच्या बाल शाखेत मुख्य शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.
राजकीय प्रवास आणि नेतृत्व
1996 साली वाणिज्य शाखेतून (बी.कॉम) पदवी मिळवली आणि 2011 साली मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (एल.एल.बी) प्राप्त केली. शिक्षण आणि नोकरी सांभाळतांना ते आपली सामाजिक जाबादबारीही पार पाडत राहिले. 1996 ते 2011 या कालावधीत त्यांनी भाजपमध्ये विविध पदे भूषवली.
- भाजयुमो उपाध्यक्ष, भाजप मंडळ सरचिटणीस, ठाणे शहर जिल्हा सचिव, युवा मोर्चा विभागीय अध्यक्ष (ठाणे-पालघर), ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस
- 2 वेळा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला
- सध्या भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी कार्यरत आहेत.
1992 मध्ये अयोध्येतील राममंदिरासाठी सुरु केलेल्या कारसेवेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यादरम्यान त्यांनी अयोध्येत 13 दिवस वास्तव्यही केले होते.
1999 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदासाठी निवड झाली.
2007 मध्ये चेंबूर कोळीवाडा, वाल्मिकी नगर येथे नगरसेवक म्हणून निवड झाली आणि त्यांनी अनेक विकासकामे राबवली. पुढे 2012 मध्ये ठाणे महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक म्हणून जबाबदारी सांभाळली.
2014 साली त्यांनी कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली.
महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्षपद
सामाजिक आणि जनसामान्यांच्या हक्कांसाठी कार्य करणाऱ्या ॲड.संदीप लेले यांची महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्राहक हक्कांसाठी त्यांनी पुढील उपक्रम सुरू केले आहेत:
- ग्राहकांसाठी कायदेशीर मदत केंद्रे स्थापन करणे
- फसवणुकीच्या प्रकरणांवर लवकर निर्णय घेण्यासाठी विशेष मोहिमा
- ऑनलाईन फ्रॉड विरोधात जनजागृती अभियान
त्यांच्या नेतृत्वाखाली ग्राहक संरक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा घडण्याची अपेक्षा आहे.
समाजासाठी एक निस्वार्थ सेवक
ॲड.संदीप लेले हे फक्त राजकीय नेते नसून लोकनेतेही आहेत. ठाण्यात त्यांनी सामाजिक सुधारणांसाठी घेतलेली मेहनत आणि वंदे मातरम् संघाच्या माध्यमातून राबवलेले उपक्रम उल्लेखनीय आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे ठाणे शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जडणघडणीत मोठा फरक पडत आहे. सामाजिक बांधिलकी आणि पारदर्शक राजकारणाचा आदर्श ॲड.संदीप लेले यांच्या कार्यातून दिसून येतो. त्यांच्या आजवरच्या या समाजकार्यात त्यांची सुविद्य पत्नी सौ.मधुरा लेले यांचीही मोलाची साथ त्यांना लाभली आहे.
वंदे मातरम् संघाचे सामाजिक योगदान
ॲड.संदीप लेले यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले ‘वंदे मातरम् संघ’ हे मंडळ ठाण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय आहे. आजवर या मंडळाने अनेक सामाजिक उपक्रम राबविले. त्यापैकी काही प्रमुख उपक्रमांचा उल्लेख इथे केला आहे.
प्रमुख उपक्रम:
- स्वच्छता मोहिमा: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि इतर अनेक उपक्रमांतर्गत ठाण्यात स्वच्छता राखण्यासाठी विविध मोहिमा राबविल्या.
- आरोग्य आणि रक्तदान शिबिरे – गरजूंसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन केले.
- पर्यावरण संरक्षण मोहिमा – वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्ती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम.
- शैक्षणिक मदत उपक्रम – गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि मोफत प्रशिक्षण वर्ग.
- महिला सुरक्षा व सशक्तीकरण कार्यक्रम – महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि कायदेशीर सल्ला शिबिरे.
- केबल धारकांचा मेळावा
- स्काय वॉक विरोधी आंदोलन
- माघी सार्वजनिक गणेशोत्सव – पाचपाखाडी विभागात दरवर्षी गणेशोत्सव साजरा होतो.
या सर्व उपक्रमांमुळे ठाणे शहराच्या सामाजिक जडणघडणीत मोठा फरक पडला आहे.
माघी गणेशोत्सव: एक सुंदर परंपरा:
ॲड.संदीप लेले आणि वंदे मातरम् संघ मागील तीन वर्षांपासून पाचपाखाडी भागात माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत.
या उत्सवाचे स्वरूप अशा प्रकारचे आहे:
- गणपती बाप्पाचे पारंपरिक पद्धतीने आगमन
- ध्वज फडकावून आणि वाद्यवृंदाच्या गजरात मिरवणूक
- मोफत आरोग्य तपासणी शिबीर
- सांस्कृतिक कार्यक्रम, भक्तिगीते, भजन व नृत्य स्पर्धा
- साहित्यिक कार्यक्रम
- नामवंतांची आणि गुणवंतांची व्याख्याने
- गणेश पूजन आणि सामाजिक प्रबोधनात्मक उपक्रम
हा गणेशोत्सव फक्त धार्मिक कार्यक्रम न राहता, सामाजिक एकता आणि पर्यावरण संरक्षण यासारख्या गोष्टींचा प्रसार करणारा उत्सव ठरतो आहे. त्या निमित्ताने अनेक मान्यवर या गणेशोत्सवाला भेट देतात.
प्रेरणादायी प्रवास
ॲड.संदीप सुरेश लेले यांचा प्रवास हा संघ स्वयंसेवक ते प्रभावी राजकीय नेतृत्व असा प्रेरणादायी आहे. समाजसेवा, स्थानिक विकास आणि युवकांना प्रेरणा देण्याचे त्यांचे कार्य निश्चितच अनुकरणीय आहे.
- वंदे मातरम् संघाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम
- माघी गणेशोत्सवाच्या माध्यमातून संस्कृतीचा प्रचार व प्रसार
- ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून नागरिकांसाठी न्याय मिळवण्याचा प्रयत्न
या सर्व गोष्टींमुळे ॲड.संदीप लेले हे ठाण्याचे एक जबाबदार आणि सक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
सामाजिक सुधारणा आणि ऐक्यासाठी अत्यंत कळवळीने मागच्या 35 वर्षांपासून अव्याहत सुरू असलेली त्यांची वाटचाल स्पृहणीय आहे.
श्री संदीप लेले यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!