Kudos to Doctor Govind Nandkumar: बेंगळुरूच्या डॉक्टरांनी 3 किमी धावत जाऊन केली महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया
Kudos to Doctor Govind Nandkumar: बेंगळुरू शहर तिथल्या रहदारीसाठी कुप्रसिद्ध आहे. तिथल्या लोकांना ट्राफिक मध्ये अडकून पडण्याची आता सवयच झाली आहे. त्यातून सध्या पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे वहातुकीची समस्या आधीक बिकट झाली आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे अत्यंत त्रासदायक ठरत आहे आणि अशातच आपल्या पेशंटचा जीव वाचवण्यासाठी असामान्य निर्णय घेणाऱ्या डॉक्टरची कहाणी प्रेरणादायी ठरत आहे.
Doctor Govind Nandkumar: तीन किलोमीटर पळत जाण्याचा निर्णय
मणिपाल हॉस्पिटल्सचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी सर्जन डॉ. गोविंद नंदकुमार (Doctor Govind Nandkumar) 30 ऑगस्ट रोजी लॅप्रोस्कोपिक पित्ताशयावर एक इमारजंसी शस्त्रक्रिया करण्यासाठी निघाले होते. पण हॉस्पिटल पासून जवळपास ३ किलोमीटर अंतरावर ते सर्जापूर-मराठाळी मार्गावरील वाहतूक कोंडीत अडकले. कोंडी इतकी प्रचंड होती की त्यामुळे त्यांना पोहोचायला उशीर होऊ शकला असता. विलंबाने महिला रुग्णाला त्रास होऊ शकतो हे लक्षात घेऊन डॉ. नंदकुमार यांनी आपली कार सोडली आणि तीन किलोमीटर पळत जाण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा: डॉक्टरांच्या रूपात देव आला धावून
नंदकुमारांनी सांगितली घटना
या घटनेबद्दल बोलताना नंदकुमार म्हणाले, “मी दररोज सेंट्रल बेंगलोर पासून बंगळुरूच्या आग्नेयेला असलेल्या मणिपाल हॉस्पिटल्स, सर्जापूर पर्यंत असा प्रवास गाडीने करतो. , जवळपास ११ किलोमीटरचा हा प्रवास करायला मला सुमारे अर्धा तास लागतो. त्यादिवशीही मी शस्त्रक्रियेसाठी मी वेळेत घर सोडले. माझी टीम पूर्ण तयार होती आणि मी पोहोचताच आम्ही शस्त्रक्रियेला सुरवात करणार होतो. पण प्रचंड ट्रॅफिक बघून मी गाडी ड्रायव्हरसोबतसोडण्याचा निर्णय घेतला आणि दुसरा काही विचार न करता हॉस्पिटलच्या दिशेने पळत सुटलो.”
रुग्णाला भूल देण्याच्या तयारीत असलेली डॉ. नंदकुमार (Doctor Govind Nandkumar) यांची टीम ते ऑपरेशन थिएटरमध्ये पोहोचताच कामाला लागली. कोणताही विलंब न करता, डॉक्टर नंदकुमार यांनी शस्त्रक्रिया पूर्ण केली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि रुग्णाला वेळेवर घरीही सोडण्यात आले. ज्या रुग्णाला शस्त्रक्रियेची आवश्यकता होती कारण ती बऱ्याच काळापासून पित्ताशयाच्या आजाराने ग्रस्त होती.
मुसळधार पावसामुळे कोंडी
गेल्या काही आठवड्यांतील मुसळधार पावसामुळे आयटी शहरात पाणी साचले होते आणि वाहतूक कोंडी झाली होती. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात बंगळुरू-म्हैसूर महामार्गावरील लांब पाणी साचलेल्या मार्गावर अडकलेली वाहने आणि पादचाऱ्यांना चालण्यास त्रास होत असल्याचे दिसून आले आहे.
नंदकुमार यांचे कौतुक
डॉ. गोविंद नंदकुमार यांची समयसूचकताआणि कामावरील निष्ठा ही सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्याच्या या कृतीबद्दल सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.