fbpx

UPI Plugin Payment System: नवीन UPI ​​प्लगइन पेमेंट सिस्टम येणार

UPI Plugin Payment

UPI Plugin Payment System: भारतात एक नवीन UPI पेमेंट प्रणाली सुरू केली जात आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पेमेंट सिस्टमद्वारे ही UPI प्लगइन टेक्नोलॉजी सादर केली जात आहे. या UPI योजनेमुळे देशातील ऑनलाइन पेमेंटची पद्धत संपूर्णपणे बदलेल, असं म्हटलं जात आहे.

UPI Plugin Payment System कशी आहे?

सध्या तुम्ही ऑनलाइन काहीही ऑर्डर करता, तेव्हा पेमेंटसाठी तुम्हाला Google Pay किंवा PhonePe सारख्या थर्ड पार्टी अ‍ॅपकडे हस्तांतरित केले जाते. या दरम्यान, पेमेंट करतांना अनेकदा अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी, UPI प्लगइन प्रणाली आणली जाणार आहे, ज्यामध्ये Google Pay आणि PhonePe सारखे थर्ड पार्टी अ‍ॅप्सची ऑनलाइन पेमेंट करताना गरज राहणार नाही. प्लगइन म्हणजे अशी प्रणाली ज्यात UPI पेमेंट अ‍ॅपची गरज नाही. यामध्ये कोणत्याही ऑनलाइन पेमेंटसाठी व्हर्च्युअल पेमेंट अ‍ॅड्रेस वापरून पेमेंट करता येईल.

हे ही वाचा : फ्रान्स, दुबई, यूकेसह 17 देशांमध्ये भारतीय UPI 

UPI Plugin Payment System चे फायदे

UPI प्लगइन ऑनलाईन पेमेंटमुळे फसवणुकीचे प्रमाण कमी होतील अशी अपेक्षा आहे. यासोबतच ऑनलाइन पेमेंटला वेग येईल. UPI प्लगइनमुळे सक्सेसफुल पेमेंटची संख्या वाढेल, असंही म्हटलं जात आहे. Google Pay आणि PhonePe, ऑनलाइन पेमेंटमधील सर्वात मोठ्या कंपन्या असून यांच्या मते UPI प्लगइन हे एक चांगले पाऊल आहे पण तरी त्यात अनेक आव्हाने आहेत.

सरकारची योजना काय आहे?

वंदे महाराष्ट्र (Vande Maharahstra) ला मिळालेल्या माहिती नुसार, सध्याच्या ऑनलाइन UPI पेमेंटपैकी PhonePe चा वाटा ४७ टक्के आहे. तर Google Pay ३३ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पेटीएम १३ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. यूपीआय पेमेंट क्षेत्रावर एक-दोन कंपन्यांचा ताबा राहू नये, अशी सरकारची ही योजना आहे. त्यासाठी सरकारने ३० टक्के कॅपची तरतूदही केली आहे.