Moonlighting: मूनलाइटिंग – समर्थन, विरोध आणि कारणे
Moonlighting: IT जायंट विप्रोने मूनलाइटिंगसाठी 300 कर्मचार्यांना काढून टाकल्याची बातमी आली आणि “मूनलाइटिंग” (Moonlighting) या संकल्पनेला पुन्हा एकदा प्रसिद्धी मिळाली. नियमित कामकाजाच्या वेळेनंतर दुसरे काम करणे याला ‘मूनलाइटिंग’ असे म्हणतात. सामान्यतः संध्याकाळी किंवा रात्री म्हणजेच चंद्रप्रकाश असताना केलेले काम अशी या संकल्पनेमागची भावना आहे. मूनलाइटिंग (Moonlighting) म्हणजे मुख्य उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणून नियमित नोकरी करायची…