कटाची आमटी
घरी पुरण घातलं आहे आणि कटाची आमटी (Katachi Aamti) बनली नाही असं कुठल्याही महाराष्ट्रीय स्वयंपाकघरात सहसा होत नाही. डाळ शिजवल्यानंतर त्यात असलेले पाणी वेगळे काढले जाते ज्याला ‘कट’ असे म्हणतात. या कटाची आमटी कशी करायची ते आज आपण पहाणार आहोत. साहित्य: चणा शिजवलेली चणा डाळ (पुरणपोळीचे पाणी गाळताना उरलेली) कांदा- खोबऱ्याचे वाटण आलं-लसूण पेस्ट कडिपत्ता…