Big Releases in December 2023 : डिसेंबर 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर जोर दाखविणार ‘हे’ दमदार चित्रपट
Big Releases in December 2023 : डिसेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये एक अतिशय रोमांचक स्पर्धा पाहायला मिळणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ चित्रपट आणि विकी कौशलचा चित्रपट ‘सॅम बहादूर’ यांच्यात थेट स्पर्धा होणार आहे. दुसऱ्या आठवड्यात मनोज बाजपेयीचा ‘जोरम’ आणि वरुण तेजचा ‘ऑपरेशन व्हॅलेंटाइन’ चित्रपट यांच्यात टक्कर होऊ शकते. आणि वर्षाच्या शेवटी शाहरुख खानचा चित्रपट ‘डंकी’ आणि प्रभासचा चित्रपट ‘सालार’ यांच्यात जोरदार टक्कर होणार आहे. वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, कतरिना कैफचा ‘मेरी ख्रिसमस’ आणि सिद्धार्थ मल्होत्राचा ‘योधा’ हे चित्रपटही डिसेंबरमध्येच प्रदर्शित होणार होते, मात्र या दोन्ही चित्रपटांनी त्यांच्या प्रदर्शनापूर्वीच शरणागती पत्करली आहे. आज बोलूया त्या चित्रपटांबद्दल जे डिसेंबर २०२३ मध्ये रिलीज होण्याच्या तयारीत आहेत.
अॅनिमल (१ डिसेंबर २०२३)
अभिनेता रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाचा टीझर लाँच झाल्यापासून तरुणांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. वाढलेली दाढी, ओठांना चिकटलेली सिगारेट आणि पत्नीपासून विचित्र अंतर राखण्याचा प्रयत्न करत असलेल्या रणबीरच्या पात्राने प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कबीर सिंग सारखा चित्रपट दिग्दर्शित केलेल्या संदीप वंगा रेड्डी यांच्या दिग्दर्शनाखाली रणबीरला पाहण्यासाठी प्रेक्षकही खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात रणबीर कपूरशिवाय रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, तृप्ती डिमरी आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत आहेत.
सॅम बहादूर (१ डिसेंबर २०२३)
अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झालेल्या ‘पिप्पा’ चित्रपटातील सॅम माणेकशॉची व्यक्तिरेखा पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांना ‘सॅम बहादूर’ या चित्रपटात हे संपूर्ण पात्र मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात विकी कौशल फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सिनेरसिकांना आवडला आहे आणि त्यामुळे सध्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. विकी कौशलसाठीही हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. ‘मसान’ आणि ‘उरी’ सारखे यशस्वी चित्रपट देणारा विकी कौशल सध्या संघर्ष करताना दिसत आहे. कतरिना कैफ बरोबर विवाह केल्यामुळे चर्चेत आलेल्या विकीला पुन्हा एकदा त्याच्या अभिनयामुळे प्रसिद्धी मिळवण्याची ही संधी आहे. या चित्रपटाचे यश त्याच्या सतत फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांची साखळी मोडू शकतो.
हे ही वाचा : ‘थलैवर 170’चे नवीन अपडेट, चित्रपटात या स्टार्सची एन्ट्री
ऑपरेशन व्हॅलेंटाईन (८ डिसेंबर २०२३)
दाक्षिणात्य अभिनेता वरुण तेजचा ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ हा चित्रपट भारतीय हवाई दलाच्या पार्श्वभूमीवर आधारित सत्य घटनांनी प्रेरित आहे. या चित्रपटात वरुण तेजसोबत यशराज फिल्म्सच्या टॅलेंट कंपनीची अभिनेत्री मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात वरुण तेज भारतीय वायुसेनेच्या पायलटच्या भूमिकेत दिसणार असून मानुषी छिल्लर रडार अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता वरुण तेजचा हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे.
जोरम (८ डिसेंबर २०२३)
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत असलेला मनोज बाजपेयी यांचा ‘जोरम’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. देवाशिष माखिजा दिग्दर्शित हा चित्रपट सर्व्हायव्हल थ्रिलर चित्रपट आहे. मनोज बाजपेयी व्यतिरिक्त तनिष्ठा चटर्जी आणि राजश्री देशपांडे यांसारखे कलाकार यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. बर्याच काळानंतर मनोज बाजपेयी यांचा चित्रपट थेट OTT वर प्रदर्शित न होता चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट आत्तापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवला गेला असून समीक्षकांनी त्याचे खूप कौतुक केले आहे.
डंकी (२२ डिसेंबर २०२३)
अभिनेता शाहरुख खानसाठी २०२३ हे वर्ष खूप लकी ठरले आहे. ‘पठाण’ आणि ‘जवान’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर शाहरुख खानचा ‘डंकी’ वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित हा चित्रपट एका मेगा प्रवासावर आधारित आहे ज्यामध्ये भारतीयांना कॅनडा आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये अवैधरित्या प्रवेश करणाऱ्यांची कहाणी आहे. चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त तापसी पन्नू, दिया मिर्झा, बोमन इराणी, धर्मेंद्र, सतीश शाह, परीक्षित साहनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात विकी कौशलचीही खास भूमिका आहे.
सालार भाग १: युद्धविराम (२२ डिसेंबर २०२३)
अभिनेता प्रभासचा चित्रपट ‘सालार पार्ट 1: सीझफायर’ची थेट स्पर्धा शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाशी होणार आहे. चित्रपटात प्रभासशिवाय पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, जगपती बाबू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘केजीएफ पार्ट वन’ आणि पार्ट टू सारखे चित्रपट दिग्दर्शित करणारे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चहाते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुख खानच्या ‘डंकी’ आणि प्रभासच्या ‘सालार’मध्ये डिसेंबरमध्ये वर्षातील सर्वात मोठी टक्कर होणार आहे असे मानले जात आहे.