iPhone 15 Series : आयफोन 15 सीरीजमध्ये Apple ने केले 5 मोठे बदल
iPhone 15 Series | आयफोन 15 सीरीज : Apple ने आपली नवीन iPhone सिरीज 15 लॉन्च केली आहे. या सीरीज अंतर्गत iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Plus सादर करण्यात आले आहेत. आयफोन 15 सिरीज टाइप-सी पोर्ट आणि वायरलेस कनेक्टिव्हिटीसह लॉन्च करण्यात आली आहे. चार्जिंगच्या बाबतीत कंपनीचा हा सर्वात मोठा बदल आहे. आयफोन 15 सिरीजमधील 5 प्रमुख बदलांबद्दल जाणून घेऊया…
आयफोन 15 सीरीज : आयकॉनिक सायलेंट बटण काढले
आयफोन 15 प्रो च्या दोन्ही मॉडेल्समध्ये आयकॉनिक सायलेंट बटण असणार नाही. नव्या सिरीज पासून हे बटन काढून टाकण्यात आले आहे. त्याच्या जागी आयफोनमध्ये नवीन अॅक्शन बटण देण्यात आले आहे. नवीन अॅक्शन बटणाच्या मदतीने फोन सायलेन्ट करण्याशिवाय फ्लाइट मोड वर टाकण्यासारखी इतरही अनेक कामे करता येतील.
आयफोन 15 सीरीज : टाइप-सी पोर्ट उपलब्ध असेल
नवीन आयफोनमध्ये टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, अॅपलने टाइप-सी पोर्टसह कोणतेही आयफोन सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कंपनी चार्जिंगसाठी लाइटनिंग पोर्ट वापरत होती. लेटेस्ट आयफोनसह कंपनीचा हा सर्वात मोठा बदल आहे.
हे ही वाचा : हे आहेत १५००० पेक्षा कमी किमतीत मिळणारे 5G मोबाईल फोन्स, Redmi पासून Samsung पर्यंत!
प्रोसेसर
कंपनीने आयफोन 15 सीरीजच्या प्रो व्हेरिएंटसह नवीन A17 बायोनिक चिपसेट प्रदान केला आहे. तर आयफोनचा बेस व्हेरिएंट जुन्या A16 बायोनिक चिपसेटने सुसज्ज आहे. हा प्रोसेसर iPhone 15 आणि iPhone 15 Plus मध्ये आहे. या प्रोसेसरसह आयफोन 14 सीरीजचे दोन मॉडेल गेल्या वर्षी सादर करण्यात आले होते.
टायटॅनियम डिझाइन
कंपनीने आयफोन 15 प्रो वेरिएंटसह टायटॅनियम डिझाइन दिले आहे. अॅपलच्या मते, नवीन आयफोनच्या प्रो मॉडेलमध्ये वापरण्यात आलेला टायटॅनियम ग्रेड नासाच्या मार्स रोव्हरमध्ये वापरण्यात आला होता. आयफोन 15 प्रो हे आतापर्यंतचे सर्वात हलके प्रो मॉडेल असेल. iPhone 15 Pro मध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले आहे आणि iPhone 15 Pro Max मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले आहे.