fbpx

Best 5G Phone Under 15000 : हे आहेत १५००० पेक्षा कमी किमतीत मिळणारे 5G मोबाईल फोन्स, Redmi पासून Samsung पर्यंत!

Best 5G Phone Under 15000 : भारतात 5G तंत्रज्ञानाचा वापर सुरु झाल्यापासून स्मार्टफोन निर्माती करणाऱ्या कंपन्या 5G स्मार्टफोन बनवण्यावर खूप जोर देत आहेत. प्रत्येकच्या खिशाला परवडतील असे मोबाईल आज बाजारात उपलब्ध झाले आहेत. तुमचं बजेट अगदी 15000 रुपयांपर्यंत असलं तरीही त्या बजेटमध्ये तुमच्यासाठी अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत. तुम्ही जर स्वतःसाठी नवीन 5G मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, हा लेख वाचल्यानंतर तुमचा शोध पूर्ण होणार आहे. ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर या बजेटमध्ये एकापेक्षा एक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला 15,000 रुपयांमध्ये येणार्‍या 5G स्मार्टफोनबद्दल (Best 5G Phone Under 15000) सविस्तर सांगत आहोत.

वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ने केलेल्या मिळवलेल्या माहिती नुसार, हे आहेत 15,000 रुपयांचे 5G मोबाईल:

Redmi 11 Prime 5G

Redmi 11 Prime 5G मध्ये 6.58-इंचाचा डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन 5 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. बजेट स्मार्टफोन खरेदी करताना तुमाची अपेक्षा असते की निदान फोनचा कॅमेरा, बॅटरी आणि परफॉर्मन्स चांगला हवा आणि या अपेक्षा हा स्मार्टफोन पूर्ण करतो. चांगली गोष्ट म्हणजे कंपनीचा हा फोन 5G सपोर्टसह येतो. Redmi 11 Prime 5G मध्ये तुम्हाला एक स्थिर प्रोसेसर, स्टँडर्ड डिस्प्ले आणि मजबूत बॅटरी मिळते. त्याचे वजन 200 ग्रॅम आहे, बटणांची गुणवत्ता चांगली आहे आणि प्लास्टिकचा दर्जाही चांगला आहे. सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक उपलब्ध आहेत आणि दोन्हीही पर्याय चांगले काम करतात. तुम्ही एंट्री लेव्हल 5G सेगमेंटमध्ये फोन शोधत असाल, तर तुम्ही या पर्यायाचा विचार करू शकता.

हे ही वाचा : वन प्लस एस २ प्रो : वनप्लसचा पहिला 24GB रॅम स्मार्टफोन लॉन्च

Poco M4 5G

Poco M4 5G च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. Poco M4 5G मध्ये 6.58-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे. कॅमेरा बद्दल बोलायचे झाल्यास पहिला कॅमेरा 50MP चा, दुसरा कॅमेरा 2MP चा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा मागील बाजूस देण्यात आला आहे. Poco M4 5G हा फोन वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, यूएसबी टाइप-सी पोर्टसह येतो. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी असून 18W फास्ट चार्जिंग उपलब्ध आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनचे एकूण वजन 200 ग्रॅम आहे. फोनला वॉटर रेझिस्टन्ससाठी IP52 रेटिंग देखील मिळाली आहे. फोनसह बॉक्समध्ये 22.5W चा अॅडॉप्टर उपलब्ध आहे. याशिवाय बॉक्समध्ये केबल आणि कव्हरही उपलब्ध आहेत.

Motorola G62 5G

Motorola G62 5G च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. Motorola G62 5G हा ड्युअल सिम (GSM आणि GSM) मोबाइल आहे जो नॅनो सिम आणि नॅनो सिम कार्डांसह येतो. Motorola G62 5G 161.83 x 73.96 x 8.59 मिमी (उंची x रुंदी x जाडी) आहे आणि त्याचे वजन 184.00 ग्रॅम आहे. हा फोन चारकोल ग्रे आणि पोर्सिलेन व्हाईट कलर पर्यायांसह उपलब्ध आहे.

Motorola G62 5G मध्ये 6.55-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे. हा फोन 5000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. हा फोन ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसरने सुसज्ज आहे. त्याच्यासोबत जोडण्यासाठी 8 GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे. त्याचबरोबर 128 GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. या फोनचा कॅमेरा दमदार आहे. पहिला कॅमेरा 50MP चा, दुसरा कॅमेरा 8MP चा आणि तिसरा 2MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच वेळी, 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy F14 5G

कोरियन मोबाईल उत्पादक सॅमसंगने 5G बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Samsung Galaxy F14 5G च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,990 रुपये आहे. Samsung Galaxy F14 5G मध्ये 6.6-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, यात 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP दुय्यम कॅमेरा आहे. त्याच वेळी, त्याच्या फ्रंटमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या बजेट फोनमध्ये तब्बल 6000mAh ची बॅटरी दिली असून ती लि-आयनची आहे. या सेगमेंटमध्ये 5nm Exynos 1330 processor दिला गेला आहे जो 5G स्पीड साठी खूपच आवश्यक आहे. Samsung Galaxy F14 5G फोनमध्ये अँड्रॉइडच्या 13 व्हर्जन वर चालणारे सॅमसंग वन UI हे ओएस दिले गेले आहे. Samsung Galaxy F14 5G स्मार्टफोन 4/128GB आणि 6/128GB या वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. 

Vivo T2x 5G

Vivo T2x 5G च्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. Vivo T2x 5G मध्ये 6.58-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे. हा फोन 5000mAh बॅटरी आणि डायमेंसिटी 6020 प्रोसेसरने सुसज्ज आहे. या फोनमध्ये 2408×1080 पिक्सेल रिझोल्यूशन उपलब्ध आहे. हा फोन वॉटरड्रॉप नॉच फ्रंट कॅमेरासह येतो. हा फोन Android 13 वर आधारित Funtouch OS प्रणालीवर काम करतो. Vivo T2x 5G मरीन ब्लू, ग्लिमर ब्लॅक आणि अरोरा गोल्ड या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. फोनमध्ये 128GB स्टोरेज उपलब्ध आहे आणि मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *