fbpx

Delicious Ragi Idli: नाचणीची इडली

Ragi Idli

Delicious Ragi Idli: नाचणी (Ragi) मधुन शरीराला कॉश्मियम मिळते तसेच प्रोटीन मिनरल्स काब्रोहायड्रेड हे सर्व आवश्यक घटकही मिळतात. म्हणुन आपल्या जेवणात नाचणीचा उपयोग आवश्यक आहे. नाचणीची इडली बनवायला सोपी आहे. कशी बनवायची? चला पाहुयात.

Delicious Ragi Idli: साहित्य

इडली आणि त्याबरोबर लागणाऱ्या चटणीचे साहित्य आणि कृती इथे देत आहे.

इडलीसाठी:

  • नाचणीचे पीठ – १ कप
  • उडदाची डाळ – १/३ कप
  • इडली रवा – ३/४ कप
  • तेल – १ स्पून
  • मोहरी – १ स्पून
  • जीरा – १ स्पून
  • हिंग – १/४ स्पून
  • बेकींग सोडा – १/२ स्पून
  • कढी पत्ता – ५-६ पाने
  • दोन हिरव्या मिरच्या (अगदी बारीक चिरलेल्या)
  • कोथींबीर (बारीक चिरलेली) – ओंजळ भर
  • मेथी / पालक बारीक चिरलेला – दोन ओंजळी किंवा आवडी नुसार कमी / अधिक. (ऐच्छिक)
  • मीठ
  • पाणी – लागेल तसे.

चटणीसाठी:

  • अर्धा ओला नारळ तुकडे करुन / खवून / किसून
  • ओंजळभर कोथींबीर
  • १-२ हिरव्या मिरच्या तुकडे करुन
  • चमचा भर लसणाची चटणी किंवा दोन लसुण पाकळ्या
  • १ लिंबू
  • थोडे काळे / थोडे पांढरे मीठ
  • पाव-अर्धा चमचा मीर पूड

हे ही वाचा: कटाची आमटी

Delicious Ragi Idli: कृती

  • उडदाची डाळ किमान आठ तास भिजत घाला. फुगून ती साधारण कपभर होते.
  • इडली रवा दोन तास भिजत घातल्यास उत्तम पण वेळेनुसार किमान अर्धा तास तरी भिजू द्यावा, फुगून तो साधरण कपभर होतो.
  • सर्व तयारी झाली की उडदाची भिजलेली डाळ मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून पिठा सारखी वाटून एका भांड्यात काढून घ्या. त्यात भिजवलेला इडली रवा आणि नाचणीचे पीठ, कोथींबीर, पालेभाजी आणि मीठ घालून थोडे थोडे पाणी घालत इडली बॅटरच्या कन्सीस्टन्सी इतपत नीट कालवून घ्या आणि किमान दहा मिनिटे मुरु द्या.
  • या वेळात आपण चटणी तयार करू शकता. चटणीसाठी लागणारे सर्व साहित्य मिक्सर मध्ये घ्या आणि त्यात थोडे पाणी घालून वाटून घ्या आणि त्यात लिंबू पिळून घ्या.
  • मग हिंग, मोहरी, जिरे, कढी पत्त्याची फोडणी करुन ती इडली मिश्रणात घाला आणि कालवून घ्या. हवे असल्यास चटणीतही फोडणी घालू शकता. इडल्या करण्याच्या १० मिनीट आधी त्यात बेकिंग सोडा घालून नीट कालवून घ्या.
  • इडली पात्रातील साच्यांना ब्रशने तेल लावुन घ्या (किंवा अधिक टिप २ पहा.) आणि इडली मिश्रण घाला. मोठ्या आचेवर १५ ते २० मिनिट वाफवून घ्या.
  • झाकण उघडून बोटाने दाबून पाहिल्यास अंदाज येतो. इथे एवढे लक्षात ठेवा की नाचणीची इडली (Delicious Ragi Idli) नेहमीच्या इडली पेक्षा कमी सॉफ़्ट होते, तशात या न आंबवता करत आहोत.
  • गॅस बंद करुन इडल्या काढण्या इतपत तपमान कमी झाले की इडल्या काढून घ्या आणि चटणी सोबत सर्व्ह करा.