fbpx

WhatsApp Down: व्हॉट्स ऍपची सेवा ९० मिनिटे ठप्प

WhatsApp Down: मंगळवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२२ रोजी जगातील अनेक देशांमध्ये सुमारे दीड तास व्हॉट्सऍपची सेवा ठप्प (WhatsApp Down) होती. जगभरात कोट्यवधी युजर्स असणारं व्हॉट्सअ‍ॅप भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास डाऊन (WhatsApp Down) झालं. त्यामुळे जगभरातील युजर्स ट्विटरवर येऊन यासंदर्भात ट्वीट्स करू लागले. एकीकडे काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याचं सांगितलं जात असतानाच दुसरीकडे हा सायबर हल्ला असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. सुरुवातीला काही काळ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मेसेजेस पाठवता येत नव्हते. मात्र, काही वेळानंतर पर्सनल चॅटदेखील बंद झाले. पहिल्या अर्ध्या तासातच हजारो युजर्सनी ही समस्या येत असल्याचं ट्विटरवर सांगितलं. सरकारने व्हॉट्सऍपची मूळ कंपनी मेटाकडून या गैरप्रकाराबाबत अहवाल मागवला आहे.

WhatsApp Down: भारतात सेवेमध्ये व्यत्यय

भारतात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये, वापरकर्त्यांनी मेटाच्या मालकीच्या व्हॉट्स ऍप मेसेंजर सेवेमध्ये व्यत्यय आल्याची तक्रार केली होती. वेबसाईट ट्रॅकर डाउन डिटेक्टरने मेसेंजर सेवा बंद (WhatsApp Down) केल्याची माहिती दिली होती. व्हॉट्सऍप काम करत नसल्याच्या बातम्या ट्विटरवरही ट्रेंड करू लागल्या. WhatsApp चे जगभरात 2 अब्जाहून अधिक सक्रिय मासिक वापरकर्ते आहेत.

WhatsApp Down: सेवा लवकर सुरळीत करण्याचा प्रयत्न

दुपारी 12.30 च्या सुमारास व्हॉट्स ऍप बंद झाल्याची बातमी समोर आली. सेवा बंद झाल्यानंतर एक तासानंतर, व्हॉट्स ऍपच्या मूळ कंपनी मेटाचे प्रवक्ते म्हणाले – आम्हाला माहिती मिळाली आहे की काही लोकांना संदेश पाठवण्यात समस्या येत आहेत. आम्ही लवकरात लवकर व्हॉट्स ऍप सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, या समस्येचे कारण कंपनीने स्पष्ट केलेले नाही.

मेसेज सिंक करण्यात समस्या

रितेश नावाच्या वापरकर्त्याने डाऊन डिटेक्टरवर समस्या नोंदवताना लिहिले की व्हॉट्स ऍप पचा क्यूआर कोड लॅपटॉपशी सिंक करण्यासाठी कनेक्ट होत नाही. संदेश पाठवला जात नाही. यापूर्वी, दिल्ली, लखनौ, कोलकाता, मुंबईसह अनेक शहरांतील वापरकर्त्यांनी मेसेजिंग सेवा कार्य करत नसल्याबद्दल तक्रारी केल्या होत्या.

हे ही वाचा: ओला इलेक्ट्रिकने दिली पहिल्या इलेक्ट्रिक कारची झलक

व्हॉट्स ऍप वर मेसेज कसे पाठवले जातात आणि प्राप्त होतात?

WhatsApp एंड-टू-एंड एन्क्रिप्शन वापरते. याचा अर्थ फक्त पाठवणारा आणि प्राप्तकर्ता संदेश वाचू शकतो. जेव्हा तुम्ही संदेश पाठवता, तेव्हा तो एका विशिष्ट एन्क्रिप्शन प्रोटोकॉलसह कूटबद्ध केला जातो. व्हॉट्स ऍप आता हा एनक्रिप्टेड मेसेज रिसीव्हरला पोहोचेपर्यंत त्याच्या सर्व्हरवर स्टोअर करतो.

डिलिव्हरी केल्यावर, प्राप्तकर्त्याचे डिव्हाइस अद्वितीय क्रिप्टोग्राफिक की वापरून संदेश डिक्रिप्ट करते. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, व्हॉट्स ऍपला तुमच्या संदेशातील मजकुराची माहिती नसते. WhatsASpp च्या एन्क्रिप्शन तंत्रज्ञानाला सिग्नल एन्क्रिप्शन प्रोटोकॉल म्हणतात. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन तुम्हाला सैद्धांतिकदृष्ट्या सुरक्षित वाटू शकते, परंतु एंड-टू-एंड एन्क्रिप्शन अपेक्षेप्रमाणे सुरक्षित नाही.

WhatsApp Down: गेल्या वर्षी सेवा 6 तास बंद

4 ऑक्टोबर 2021 रोजी फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्स ऍप प्लॅटफॉर्म (WhatsApp Down) सुमारे 6 तास बंद होते, ज्यामुळे अब्जावधी वापरकर्त्यांना समस्यांना सामोरे जावे लागले. या आउटेजचा परिणाम अमेरिकेतील फेसबुकच्या शेअर्सवरही दिसून आला आणि कंपनीचे शेअर्स 6% नी घसरले. फेसबुकचे जगभरात 2.85 अब्ज मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत. तर व्हॉट्स ऍपचे २ अब्ज आणि इंस्टाग्रामचे १.३८ अब्ज युजर्स आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *