32 वर्षांनंतर काश्मीरमध्ये मल्टिप्लेक्स सिनेमा सुरु

32 वर्षांनंतर काश्मीरमध्ये मल्टिप्लेक्स सिनेमा सुरु

रविवार १८ सप्टेंबर रोजी, म्हणजे तब्ब्ल ३२ वर्षांनी दक्षिण काश्मीरमधील शोपियान आणि पुलवामा या जिल्ह्यांमध्ये मल्टिप्लेक्स सिनेमा हॉल्सचे उद्घाटन करण्यात आले आहे.

नव्वदीच्या दशकामध्ये मल्टीप्लेक्स ही नवी संकल्पना देशात रुजत होती पण त्याच सुमारास काश्मीर फुटीरतावादी दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे होरपळत होते. 

१९९९ मध्ये काश्मीरमध्ये मल्टीप्लेक्स बांधण्याचा विचार तेथील चित्रपटगृहांच्या मालकांनी केला होता. पण सुरु असलेल्या चित्रपटगृहांवरच मर्यादा आल्याने तो विचार कोणालाही सत्यात उतरवता आला नाही.

जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी १८ सप्टेंबर 2022 रोजी दक्षिण काश्मीरच्या शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका मल्टीप्लेक्स सिनेमाचे उद्घाटन केले.

मनोज सिन्हा यांनी ट्वीट केलेल्या फोटोंद्वारे या मल्टीप्लेक्समधील चित्रपटगृहामध्ये ‘आरआरआर’ आणि ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात आल्याचे दिसून येत आहे. 

1 जानेवारी 1990 रोजी श्रीनगर, अनंतनाग, बारामुल्ला, सोपोर, हंदवाडा आणि कुपवाडा येथे बंदी घातलेल्या JKLF आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांच्या “आदेशानुसार” 19 चित्रपटगृहे बंद करण्यात आली  होती.

 तेव्हापासून अनेकदा काश्मीर खोऱ्यात सिनेमाग्रहांना पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. ही तीन दशकांची प्रतीक्षा अखेर १८ संप्टेंबरला संपली.