आजवर झालेल्या  टी-२० विश्वचषक स्पर्धांमध्ये अशी होती  टीम इंडियाची जर्सी

आत्तापर्यंत टी २० विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताच्या जर्सीचे रंग आणि रचना अनेकदा बदलल्या आहेत.   कश्या होत्या या जर्सीज?  चला पाहुयात.  

पहिला T20 विश्वचषक २००७ मध्ये खेळला गेला होता.  टीम इंडियाने त्यावेळच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या जर्सीमध्येच T20 विश्वचषक खेळला होता.

त्यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनीकडे होते. दक्षिण अफ्रिकेत झालेल्या या स्पर्धेत भारताला विजेतपद मिळाले होते.

२००९ मध्ये भारतीय संघाची विश्वचषक जर्सी खूप बदलली. नेव्ही ब्लू जर्सीमध्ये विश्वचषक खेळण्यासाठी पोहोचला.  मात्र, भारतीय संघ या टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये विशेष कामगिरी करू शकला नाही.

२०१० मध्येच टी २० विश्वचषक स्पर्धेअगोदरही भारतीय संघाच्या नेव्ही ब्लू जर्सीच्या रंगात थोडा बदल झाला होता.  मात्र, या वर्षीही संघ विशेष कामगिरी करु शकला नाही.

२०१२ मध्ये आशिया खंडात पहिल्यांदाच टी २० स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भारतीय संघाची जर्सी जुन्या शैलीत बनवली गेली होती. यावेळीही भारतीय संघाची कामगिरी निराशजनकच राहिली.

२०१४ मध्येही टी २० विश्वचषक आशियामध्ये झाला. त्या वर्षी भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. मात्र, अंतिम फेरीत भारताचा पराभव करत श्रीलंकेने विजेतेपत पटकावले.

२०१६ च्या टी २० विश्वचषक स्पर्धत धोनीच्या नेतृत्वाखाली संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहचला होता. यावेळी संघाची जर्सी वनडेच्या जर्सीपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसत होती.

२०२१ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी तयार केलेली जर्सी फार लोकप्रिय झाली. पण भारतीय संघ या स्पर्धेतही सपशेल फेल ठरला.  पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पराभवांमुळे भारताला पुढची फेरीही गाठता आली नाही.

यावर्षी २०२२ साली खेळल्या जाणाऱ्या टी २० वर्ल्डकप पूर्वी भारताने नवीन जर्सी लाँच केली आहे. जर्सीचा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

vandemaharashtra.com