गुजराती चित्रपट  'छेल्लो शो' करणार  ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

ऑस्कर पुरस्कार हा मानाचा पुरस्कार मानला जातो. जगभरातील उत्कृष्ट चित्रपटांचा या सोहळ्यात गौरव केला जातो. 

गेले काही दिवस ऑस्कर २०२३ मध्ये कोणत्या चित्रपटाला नामांकन मिळणार याच्या सर्वत्र चर्चा रंगल्या होत्या.

या स्पर्धेत ‘आरआरआर’ आणि द काश्मीर फाईल्स या चित्रपटांपैकी एकाची निवड होणार अशा चर्चा होत्या. 

पण फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने गुजराती चित्रपट 'छेल्लो शो' ची निवड करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले.  

छेल्लो शो’ चित्रपटाची कथा एका ९ वर्षाच्या मुलाभोवती फिरते जो भारतातील एका दुर्गम खेड्यात राहतो.  त्याला चित्रपट पाहायला खूप आवडतात.

एक लहान मुलगा प्रोजेक्शन बूथमधून चित्रपट पाहण्यात उन्हाळा कसा घालवतो हे चित्रपटात दाखवले गेले आहे.  

‘अँग्री इंडियन गॉडेसेस’, ‘संसार’ आणि ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे पान नलिन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. 

या चित्रपटात भावीन रबारी, विकास बाटा, ऋचा मीना, भावेश श्रीमाळी, दिपेन रावल आणि राहुल कोळी यांच्या भूमिका आहेत.

vandemaharashtra.com