डाळिंब खाण्याचे आरोग्यदायी फायदे

डाळिंब पित्ताचा त्रास, भूक, जुलाब, आमांश, खोकला, डोळ्यांची जळजळ, छातीची जळजळ आणि मनाची अस्वस्थता दूर करते. डाळिंब खाल्ल्याने शरीरात एक विशेष चैतन्य येते.

डाळिंबाचा रस स्वरयंत्र, फुफ्फुस, हृदय, यकृत, पोट आणि आतड्यांसंबंधी रोगांवर फायदेशीर आहे आणि शरीरात शक्ती, ऊर्जा आणि स्निग्धता आणतो.

गोड डाळिंबाचा रस हे तृप्त करणारे पेय आहे.  डाळिंबाच्या रसातील क्षुधावर्धक गुणामुळे भूक वाढते आणि पचन व्यवस्थित होते. डाळिंबाचा रस सप्तधातुवर्धक आणि बलदायी आहे.

डाळिंबाच्या सालीही अत्यंत औषधी असतात.  डाळिंबाच्या सालीपासून आयुर्वेदिक दंतमंजन तयार करतात. या दंतमंजनामुळे दात पांढरेशुभ्र व बळकट होतात. डाळिंबाच्या सालीचे चूर्ण हिरड्यांमधला रक्‍तस्राव व हिरडीदुखी या आजारावर गुणकारी आहे.

डाळिंबाच्या आतील मलईदार पांढरा व लाल रंग अँटिऑक्सिडंट्सची पातळी वाढवण्यास मदत करतो. डाळिंबाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. 

डाळिंबात अँटीडायबेटिक गुणधर्म असल्याचे आढळले जे मधुमेहाच्या रुग्णांना चांगले आहे. डाळिंब घेतल्यास मधुमेह कमी होतो. डाळिंबाच्या रसामध्ये असणारी साखर रक्तातील साखर नियंत्रित करण्यासही मदत करू शकते.

डाळिंब झाडाच्या सर्व भाग जसे फळे, फळांची साल, पाने, फुले, मुळ्या तसेच झाडाच्या सालीचे विविध आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे डाळिंबाचे सेवन लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनी करणे आवश्यक आहे. 

डाळिंब या वनस्पतीचे शास्त्रीय नाव "प्युनिका ग्रॅनेटम" असे आहे. डाळिंबाला संस्कृतमध्ये "दाडिम' आणि इंग्रजीत 'पोमग्रॅनेट' असे म्हणतात'. ही वनस्पती साधारण ३ ते ५ मीटर उंच होते. या फळाचा उगम इराण, अफगाणिस्तान आणि बलुचिस्तान येथे आहे असे मानले जाते.  

https://vandemaharashtra.com