ठाणे, दिनांक १४ ऑगस्ट २०२२
VrukshaValli: भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विश्वात्मके देवे मंडळींनी अनोख्या पद्धतीने साजरा करून तिरंग्याला सलामी दिली.हे सर्व देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी या भावनेतून विश्वात्मकें देवें साधक मंडळी, वृक्षरोपण, वृक्षसंवर्धन, निसर्गसंवर्धन, गोपालन, मंदिराचा जीर्णोद्धार, अध्यात्मीक ग्रंथ प्रसार यासाठी प्रयत्न करत आहेत. या मंडळींचे निसर्गप्रेम, गोमाता प्रेम, देशप्रेम, आणि धर्मनिष्ठा याप्रती प्रत्यक्ष आणि निरपेक्ष आचरण होत आहे, हे पाहून ईश्वर त्यांच्यावर प्रसन्न होत आहे. त्यांनी उभारलेल्या मंदीरात आणि त्यांच्या अंतकरणात ईश्वराने आपले अधिष्ठान मांडले आहे. त्याच्या कृपेने त्यांनी लावलेली झाडे आता मोठी होऊ लागली असून डौलने डुलत आहेत. विश्वात्मकें देवें मंडळीनी आपली देशभक्ती, धर्मनिष्ठा आणि ईश्वरीप्रेम झाडामध्ये सुध्दा निर्माण केली आहे. त्यांनी लावलेली झाडं पाहताना झाडेसुध्दा ईश्वराचे भजन करतात. झाडामध्ये सुध्दा देशप्रेम निर्माण होऊन हर घर तिरंगा, हर मन तिरंगा. या मोहीमेत सहभागी झालेली दिसतात.
हे ही वाचा: सुपर वासुकी: 3.5 किमी लांबीची भारतीय रेल्वेची ट्रेन
VrukshaValli: विश्वात्मके देवे मंडळींचे कार्य
गेली १०-१२ वर्षे भारतातील विविध भागात जवळजवळ ४० हजार पेक्षा जास्त देशी वृक्षसंपदा लावून वाढवत आहेत, सांभाळ करत आहे. हे कार्य करताना आतापर्यंत इतर कोणाची अर्थीक मदत न घेता, आपल्या स्वतःच्या कमाईतूनच वेळोवेळी आवश्यकतेनुसार वर्गणी काढून कार्य सिद्धीस नेण्याचा प्रयत्न करत आहेत. हे कार्य पांडवकडा-खारघर, सिध्दोबाचा डोंगर चिखली, जरंडेश्वर डोंगर, जानाई माळ, वेटने, बोथे, सातारा, शंभो महादेव डोंगर येरवळे कराड, बोपदेव घाट पुणे, यमाई माळ, आवे(पंढरपूर), लोटेवाडी, निंबवडे, मासाळवाडी, आटपाड, ऊल्लेगिड्डीवाडी या भागात हिरीरीने अविरत चालू आहे.
गोशाळा चालू करून देशी गोमातेची सेवा आणि प्रसार करत आहेत. मंदीर उभारून मंदीरात वैष्णव मेळावा, संत्संगाच्या माध्यमातून प्रत्येक मानसात भक्तीभाव, देशप्रेम, धर्मनिष्ठा निर्माण करत आहेत. संत वांङमयातून हिंदू सनातन तत्व समजावून सांगून धर्माचे पालन आणि पाखांड खंडन करत आहेत. त्यांचे प्रयत्न, निष्ठा आणि श्रध्दा पाहून ईश्वराला आनंद आणि समाधान वाटावे असे त्यांचे कार्य चालू आहे.