fbpx

Virat Kohli Century: धावांचा डोंगर रचत संपवला कसोटी शतकांचा दुष्काळ

Virat Kohli Century: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने आपल्या कसोटीतील शतकांचा दुष्काळ संपवला आहे. अहमदाबादमध्ये त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 28 वे शतक (Virat Kohli Century) झळकावले. त्याचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75 वे शतक आहे. यासह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. सचिनने भारतासाठी एकूण 100 शतके झळकावली होती. त्याचबरोबर विराटने आतापर्यंत 75 शतके ठोकली आहेत. यापैकी 28 शतके कसोटीत, 46 एकदिवसीय आणि एक टी-20 मध्ये आहे.

Virat Kohli Century: 23 सामने आणि 41 डावांनंतर कसोटी शतक

विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमधील मागील शतक नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध झाले होते. यानंतर त्याला कसोटी क्रिकेटमध्ये शतकही करता आले नाही. आता त्यांनी हा दुष्काळ संपवला आहे. विराट कोहलीने 23 सामने आणि 41 डावांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. यापूर्वी, त्याला कसोटीतील दोन शतकांदरम्यान जास्तीत जास्त 11 डावांची प्रतीक्षा करावी लागली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे हे त्याचे 16 वे शतक आहे. त्याने कसोटी आणि वनडेमध्ये प्रत्येकी आठ शतके झळकावली आहेत.

हे ही वाचा: WPL चे वेळापत्रक

Virat Kohli Century: विराटचे दुसरे संथ शतक

विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमधील हे दुसरे सर्वात संथ शतक आहे. या शतकासाठी त्याने 241 चेंडूंचा सामना केला. कोहलीचे सर्वात संथ शतक 2012 मध्ये नागपूरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध झाले होते. त्या सामन्यात त्याने आपल्या शतकासाठी 289 चेंडूंचा सामना केला.

विराट कोहलीने 16व्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक (Virat Kohli Century) झळकावले आहे. कोणत्याही एका देशाविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. या बाबतीत सचिन अव्वल आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 शतके झळकावली. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकावर डॉन ब्रॅडमन आहे, ज्यांनी इंग्लंडविरुद्ध 19 शतके झळकावली आहेत.

कोहलीचे हे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १६ वे शतक आहे. तसेच एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक २० शतके झळकावण्याचा विक्रम आहे.

एका संघाविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारे फलंदाज

२० सचिन तेंडुलकर विरुद्ध ऑस्ट्रेलिया
१९ डॉन ब्रॅडमन विरुद्ध इंग्लंड
१७ सचिन तेंडुलकर विरुद्ध श्रीलंका
१६ विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया*
१६ विराट कोहली विरुद्ध श्रीलंका

सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहली खूप पुढे गेला आहे. जो रूट ४५ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहली आता त्याच्यापेक्षा ३० शतकांनी पुढे आहे.

सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके:

विराट कोहली – ७५*
जो रूट – ४५
डेव्हिड वॉर्नर – ४५
रोहित शर्मा – ४३
स्टीव्ह स्मिथ – ४२

सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडला

विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील हे ७५ वे शतक (Virat Kohli Century) आहे. त्याने या टप्प्यावर पोहोचण्यासाठी सर्वात जलद शतक करण्याचा विश्वविक्रम केला आहे. कोहलीच्या आधी हा विक्रम क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने ५६६ डावांत ७५ शतके पूर्ण केली, तर कोहलीने ५५२ डावांत हा पराक्रम केला.

कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीचा हा सर्वात मोठा शतकाचा दुष्काळ आहे. २७व्या शतकानंतर त्याने २८वे शतक पूर्ण करण्यासाठी एकूण ४१ डाव घेतले. यापूर्वी त्याने ११वे ते १२वे शतक यादरम्यान ११ डाव घेतले होते. या शतकाने कोहलीने सुटकेचा नि:श्वास सोडला असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *