Vidyut Jamval Movie IB71 : बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल ‘IB71’ (Vidyut Jamval Movie) नावाचा दमदार चित्रपट घेऊन येत आहे. हे १९७१ मधील एका मोठ्या गुप्त मिशनच्या सत्य घटनेवर असलेल्या IB71 या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. या मिशनसाठी ३० एजंटनी १० दिवसांत एक मोहीम आखली आणि भारताला विजय मिळवून दिला होता. १८६५ च्या युद्धानंतर १९७१ मध्ये पाकिस्तानने भारतावर वचपा काढण्यासाठी मोठी तयारी केली होती. हा हल्ला थांबवण्याची ही साहस कथा या चित्रपटातून उलगडणार आहे. पाकिस्तानविरुद्ध देशाला विजय मिळवून देणारी ही कथा तब्बल ५० वर्षे लोकांपासून दडवून ठेवली होती. आता हीच कथा मोठ्या पडद्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे.
Vidyut Jamval Movie IB71 : थरारक दृश्यांनी भरलेला दमदार ट्रेलर
‘IB71’ च्या ट्रेलरची सुरुवात एका विमानाने होते, ज्याचा IB एजंट विद्युत जामवाल पायलट आहे, हे विमान क्रॅश होणार आहे. आत बसलेले सगळे घाबरलेले दिसतात. कोणीतरी त्यांना लँडिंग रद्द करण्याचा सल्ला देताना आपल्याला दिसत आहे. ट्रेलरवरुन हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचे दिसून येते. आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना विद्युतने लिहिले, “30 एजंट, 10 दिवस आणि 1 टॉप सीक्रेट मिशन जे गेल्या 50 वर्षांपासून लपलेले होते.1971 च्या युद्धात पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून देणारी कथा पाहण्यासाठी सज्ज व्हा. #IB71 ट्रेलर रिलीज झाला आहे.”
हा चित्रपट 12 मे रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमध्ये अनुपम खेर आणि विद्युत जामवाल अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात विशाल जेठवा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एक स्पाय-अॅक्शन थ्रिलर आहे.
हे ही वाचा: मुथय्या मुरलीधरनच्या ‘800’ या बायोपिकचे पोस्टर प्रकाशित
विद्युत जामवालचे निर्माता म्हणून पदार्पण
या चित्रपटाद्वारे, १९७१ च्या भारत-पाक युद्धात आपल्याला विजय मिळवून देणार्या या अविश्वसनीय सत्य कथेचे साक्षीदार आता आपल्याला व्हायची संधी या चित्रपटातून मिळणार आहे. हे मिशन ५० वर्षे लपवून ठेवण्यात आले होते. या अॅक्शन चित्रपटाद्वारे विद्युत जामवाल निर्माता म्हणूनही पदार्पण करणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते संकल्प रेड्डी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. विद्युत जामवालच्या अॅक्शन हीरो फिल्म्सअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तर टी-सीरीज फिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेन्मेंट हा चित्रपट सादर करणार आहेत. चित्रपटाची कथा आदित्य शास्त्री यांनी लिहिली आहे तर पटकथा स्टोरीहाऊस फिल्म्स एलएलपीची आहे. हा चित्रपट १२ मे २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.