TRAI sets deadline for barring fake call-SMS : फेक कॉल्सला आळा घालण्यासाठी आता ट्रायने कसली कंबर

TRAI sets deadline for barring fake call-SMS: भारतातील टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने कॉलिंगच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांतर्गत TRAI एक फिल्टर सेटअप करीत आहे. हा नियम १ मे २०२३ पासून फोनमधील फेक कॉल आणि SMS ला रोखण्याचे काम करणार आहे. यानंतर यूजर्सची अज्ञात कॉल आणि मेसेज पासून सुटका होणार आहे. जाणून घ्या या नवीन नियमांसंबंधी.

१ मे पासून लागू होणार नवीन नियम

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने या मुद्द्यावर टेलिकॉम कंपन्यांना एक आदेश जारी केला आहे. ते आपल्या फोन कॉल आणि मेसेज सेवेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पॅम फिल्टर लावणे गरजेचे आहे. हे फिल्टर यूजर्सला फेक कॉल आणि मेसेज पासून सुरक्षित ठेवण्यास मदत करेल. या नवीन नियमानुसार, फोन कॉल आणि मेसेज संबंधित सर्व टेलिकॉम कंपन्यांना १ मे २०२३ पासून फिल्टर लावावे लागणार आहे.

हे ही वाचा : निळ्या, राखाडी आणि सोनेरी चेकमार्कचा खरोखर अर्थ काय आहे?

जिओ मध्ये लवकरच सुरू होणार ही सुविधा

या संबंधी एअरटेलने आधीच एक प्रकारच्या AI फिल्टरची सुविधा देण्याची घोषणा केली आहे. तर जिओने या नवीन नियमांनुसार, आपल्या सेवेत AI फिल्टर लावण्याची तयारी करण्याची घोषणा केली आहे. सध्या यासंबंधी जास्त माहिती समोर आली नाही. परंतु, असा अंदाज लावला जात आहे की, भारतात AI फिल्टरचे अर्ज १ मे २०२३ पासून सुरू होणार आहेत.

TRAI sets deadline for barring fake call-SMS : प्रमोशन कॉल्सला आळा बसणार

ट्रायकडून फेक कॉल आणि मेसेजला रोखण्यासाठी नियम बनवण्यासाठी एक योजना बनवली आहे. याअंतर्गत ट्रायने १० अंकाच्या मोबाइल नंबरवरून करण्यात येणाऱ्या प्रमोशनल कॉलला रोखण्याची मागणी केली आहे. याशिवाय, ट्राय कॉलर आयडी फीचर सुद्धा आणले आहे. जे कॉल केल्यानंतर फोटो आणि नाव डिस्प्ले होणार आहे. टेलिकॉम कंपन्या एअरटेल आणि जिओची TrueCaller अॅप सोबत चर्चा सुरू आहे. परंतु, ते कॉलर आयडी फीचर लागू करण्यापासून आढेवेढे घेत आहे. कारण, त्यांच्या म्हणण्यानुसार, असे केले तर काही नवीन समस्या निर्माण होऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *