fbpx

Team India Photoshoot: टी20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाचं Super Stylish फोटोशूट

Team India Photoshoot: ICC T20 वर्ल्ड कपमध्ये 22 ऑक्टोबरपासून सुपर-12 सामने सुरू होणार आहेत. सुपर-12 चा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) होणार आहे आणि त्यासाठी सर्वत्र उत्साह आहे. एकीकडे सोशल मीडियावर दोन्ही संघांचे चहाते आपापसात भिडताना दिसत आहेत तर दुसरीकडे दोन्हीही संघ सराव आणि इतर कार्यक्रमात गुंग आहे.

या सामन्यापूर्वी भारतीय संघ फोटोशूटसाठी पोहोचला. फोटोशूट दरम्यान भारतीय संघाचे खेळाडू आपापसात मस्ती करताना दिसले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Team India Photoshoot फोटोशूट दरम्यान खेळाडूंनी मस्ती केली

23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्धच्या महान सामन्यापूर्वी भारतीय संघ फोटोशूट (Team India Photoshoot) साठी पोहोचला होता. यावेळी टीम इंडियाचे सर्व खेळाडू खूप मस्तीच्या मूडमध्ये दिसले. या फोटोशूटमध्ये भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन भारतीय कर्णधाराची नक्कल करताना दिसला. तर अनुभवी फलंदाज विराट कोहलीही कॅमेऱ्यासमोर जबरदस्त पोज देताना दिसला.

टीम इंडियाच्या या फोटोशूटचा (Team India Photoshoot) व्हिडिओ T20 वर्ल्ड कपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. क्रिकेट चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. भारतीय संघाचे हे फोटोशूट पाहून चाहते खूप खूश आहेत. 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.

पावसामुळे भारत-पाकिस्तानचा सामना खराब होऊ शकतो

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची मजा पावसामुळे खराब होऊ शकते. वास्तविक, रविवारी 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दिवशी मेलबर्नमध्ये पावसाची 70 टक्के शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांच्या चाहत्यांची निराशा होऊ शकते. मात्र, मेलबर्नमध्ये पावसाचा सामना करण्यासाठी ड्रेनेजसाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे, जेणेकरून त्याचा सामना करता येईल. त्या दिवशी हलका पाऊस पडला तर हा सामना खेळवला जाऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *