Team India for U19 Women’s World Cup: प्रथमच होणार महिला U-19 टी-20 विश्वचषक: BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा

Team India for U19 Women’s World Cup: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी (ICC), प्रथमच महिला अंडर-19 T20 विश्वचषक आयोजित करणार आहे. पुढील वर्षी 14 ते 29 जानेवारी २०२३ दरम्यान दक्षिण आफ्रिकेत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंडर-19 T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा (Team India for U19 Women’s World Cup) केली आहे. वरिष्ठ संघात आपली प्रतिभा सिद्ध करणाऱ्या हरियाणाच्या शेफाली वर्माची संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. श्वेता सहगलला संघाची उपकर्णधार बनवण्यात आली आहे. रिचा घोष आणि हर्षिता बसू या दोन खेळाडूंची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका

वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिकाही खेळणार आहे. विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे. अशा परिस्थितीत बोर्डाने मालिकेसाठी स्वतंत्र संघ जाहीर केला आहे. 27 डिसेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. तर शेवटचा सामना 4 जानेवारी 2023 रोजी होणार आहे.

हे ही वाचा: तुराजने गायकवाडचा विश्वविक्रम – एका षटकात ठोकले 7 षटकार

विश्वचषक स्पर्धेचे स्वरूप

या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. आतापर्यंत 12 संघ थेट पात्र ठरले आहेत. यामध्ये भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे या 11 देशांचा समावेश आहे. यामध्ये अमेरिकेला सदस्य राष्ट्र असल्यामुळे पात्रता दिली गेली आहे. उर्वरित चार जागांसाठी अनेक देशांदरम्यान स्पर्धा होणार आहे. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत अंडर-19 टी20 विश्वचषकासोबतच आयसीसी महिला T20 विश्वचषकही खेळवला जाणार आहे.

भारतीय संघाला यजमान राष्ट्र दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंडसह ‘ड’ गटात स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ सुपर सिक्समध्ये प्रवेश करतील.

सुपर सिक्समध्ये संघांची 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. दोन्ही उपांत्य फेरीचे सामने 27 जानेवारीला एकाच मैदानावर खेळवले जातील. त्यानंतर 29 जानेवारीला अंतिम सामना होणार आहे.

Team India for U19 Women’s World Cup: विश्वचषकासाठी अंडर-19 संघ

अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय संघ (Team India for U19 Women’s World Cup) असा आहे:
शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, हर्षिता बसू (यष्टीरक्षक), सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी , पार्शवी चोपड़ा, तीता साधु, फलक नाज, शबनम एमडी।. स्टँडबाय खेळाडू: शिखा, नजला सीएमसी, यशश्री.

दक्षिण आफ्रिकेसाठी अंडर-19 महिला संघ

शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, हर्षिता बसू (विकेट कीपर), सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्श्वी चोप्रा, टिटा साधू, फलक नाझ, शबनम एमडी, शिखा, नजला सीएमसी, यशश्री.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *