भारतीय नौदलाची ताकद आता वाढणार आहे. भारतीय नौदलाच्या सेवेत ‘तारागिरी’ ही युद्धनौका दाखल होणार आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) येथे प्रकल्प १७ ए मधील तिसरी युद्धनौका ‘तारागिरी’चे जलावतरण करण्यात आले आहे.
भारतीय नौदलाच्या प्रकल्प 17A अंतर्गत तयार करण्यात येणारे ‘तारागिरी’, हे पाचवे स्टेल्थ गाइडेड-मिसाईल फ्रिगेट रविवार, ११ सप्टेंबर २०२२ रोजी मुंबईत लॉन्च करण्यात आले. नौदलाच्या 50,000 कोटी रुपयांच्या प्रकल्प 17A कार्यक्रमांतर्गत, एकूण सात जहाजे – चार एमडीएल आणि तीन गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (GRSE) – सुधारित स्टिल्थ वैशिष्ट्यांसह, प्रगत स्वदेशी शस्त्रे आणि इतर अनेक सुधारणांसह बांधली जात आहेत.
तारागिरी युद्धनौकेचे आज जलावतरण
तारगिरी प्रकल्पाची सुरुवात १० स्प्टेंबर २०२० मध्ये करण्यात आली होती. या युद्धनौकेचे आरेखन भारतीय नौदलाच्या अंतर्गत असलेल्या नौदल डिझाईन ब्युरोने केले आहे. तर येत्या ऑगस्ट २०२५ मध्ये ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करणे अपेक्षित आहे. याआधीच माझगाव डॉक लिमिटेडने ‘उदयगिरी’ आणि ‘सूरत’ या युद्धनौकांचे नुकतेच लॉंचिंग केले होते. संपूर्ण तारागिरीचे काम हे इंटिग्रेटेड कंस्ट्रक्शन मेथडॉलॉजीने करण्यात येत आहे. त्यामध्ये ब्लॉकची निर्मिती विविध ठिकाणी करूनच माझगाव डॉक लिमिटेड येथे हे सुटे भाग जोडण्यात येणार आहेत. जवळपास ३५१० टनची युद्धनौका नौदलाला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. ब्युरो ऑफ नेव्हल डिझाईनच्या माध्यमातून या युद्धनौकेचे डिझाईन करण्यात आले आहे.
‘तारागिरी’ युद्धनौकेची वैशिष्ट्ये
एमडीएलच्या माध्यमातून डिटेल डिझाईन आणि युद्धनौका बांधणीचे काम हे वॉरशीप ओव्हरसिईंग टीमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दोन गॅस टर्बाईन्स तसेच २ डिझेल इंजिनच्या माध्यमातून २८ नॉटिकल माईल्सचा वेग गाठणे हे युद्धनौकेला शक्य होणार आहे. यासाठी कार्बन मायक्रो अलॉय स्टीलचा वापर करण्यात आला आहे. तसेच युद्धनौकेसाठीची शस्त्रे, सेन्सर, एडव्हान्स एक्शन इन्फॉर्मेशन सिस्टिमचा वापरही करण्यात आला आहे. सरफेस टू सरफेस अशा मिसाईल सिस्टिमचाही वापर युद्धनौकेसाठी करण्यात आला आहे. गनफायर सपोर्टही युद्धनौकेसाठी देण्यात आला आहे. तसेच रॉकेट लॉंचरचे फीचरही समाविष्ट करण्यात आले आहे.
जहाजांना पर्वत रांगांची नावे
- प्रकल्प 17A अंतर्गत सर्व जहाजांना भारतातील पर्वत रांगांची नावे देण्यात आली आहेत. ‘तारागिरी’ हे नाव गढवाल, उत्तराखंड येथे असलेल्या हिमालयातील एका पर्वतरांगेच्या नावावरून देण्यात आले आहे.
- प्रोजेक्ट 17A चे पहिले जहाज, ‘निलगिरी’, 28 सप्टेंबर 2019 रोजी लाँच करण्यात आले आणि 2024 च्या पहिल्या सहामाहीत त्याच्या सागरी चाचण्या होणे अपेक्षित आहे.
- दुसरे जहाज, ‘हिमगिरी’, 14 डिसेंबर 2020 रोजी लाँच करण्यात आले आणि पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
- तिसरे जहाज, ‘उदयगिरी’, या वर्षी 17 मे रोजी लाँच करण्यात आले होते आणि 2024 च्या उत्तरार्धात सागरी चाचण्या सुरू होण्याची अपेक्षा आहे.
- चौथे जहाज ‘दुनागिरी’ 15 जुलै 2022 रोजी लाँच करण्यात आले होते.
- 5 मार्च 2021 आणि 28 जून 2022 रोजी सहाव्या आणि सातव्या जहाजाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यांना INS विंध्यगिरी आणि INS महेंद्रगिरी असे नाव देण्यात येईल.
प्रकल्प 17A जहाजे प्रकल्पांसाठी लागणारी 80% सामग्री/उपकरणे स्वदेशी विक्रेत्यांकडून मिळवत आहेत. हे 2,000 हून अधिक भारतीय कंपन्या आणि लघु उद्योजकांसाठी रोजगार निर्माण करत आहेत.