चित्रपटगृहात पहाता येणार टी२० विश्वचषक सामने

१६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषकाला (ICC Men’s T20 World Cup 2022 ) सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी जगभरातल्या क्रिकेट चहाते उत्सुक आहेत चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.

क्रिकेट प्रेमींसाठी गुड न्यूज

भारतातल्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टी२० विश्वचषकादरम्यान भारताच्या सामन्यांचा आनंद चाहते सिनेमागृहात मोठ्या पडद्यावर घेऊ शकणार आहेत. आयनॉक्सच्या मल्टिप्लेक्समध्ये टीम इंडियाचे सामने दाखवले जातील. यासाठी आयनॉक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (International Cricket Council) म्हणजेच आयसीसीशी करार केला आहे. आयनॉक्स लीझर लिमिटेडने (INOX Leisure Ltd) या बाबत माहिती देताना म्हंटले आहे की, भारताचे सर्व सामने आयनॉक्सच्या सिनेगृहात प्रसारित केले जातील. चाहत्यांना भारतातल्या २५ शहरांमध्ये ही सुविधा मिळेल. क्रिकेट चाहत्यांना मोठ्या पडद्यावर भारताच्या सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.

कंपनीतर्फे निवेदन

करारानुसार भारतीय संघाचे सर्व गट सामने आयनॉक्सच्या मल्टिप्लेक्समध्ये प्रसारित केले जातील. टीम इंडिया २३ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. गट सामन्यांव्यतिरिक्त, उपांत्य फेरी आणि अंतिम सामने देखील आयनॉक्सवर दाखवले जातील. “टीम इंडियाचे सर्व सामने देशभरातील २५ हून अधिक शहरांमधील आयनॉक्सच्या मल्टिप्लेक्समध्ये प्रसारित केले जातील,” असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

१६ ऑक्टोबरपासून विश्वचषकाची सुरूवात

ICC पुरुषांच्या T20 विश्वचषकाची आठवी आवृत्ती १६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे, सुपर १२ स्टेजची सुरुवात २२ ऑक्टोबरपासून होईल. अंतिम सामना १३ नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये होणार आहे. INOX Leisure चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद विशाल म्हणाले, “सिनेमांमध्ये क्रिकेटचे प्रदर्शन करून, आम्ही आपल्या देशातील सर्वात आवडत्या खेळाचा थराराचा अनुभव मोठ्या स्क्रीनवर टाळ्या-शिट्ट्यांसह एकत्र आणत आहोत. जगभरातील उत्साह आणि भावना लक्षात घेता मोठ्या स्क्रीनवर सामने पाहणे क्रिकेटप्रेमींसाठी एक व्हर्च्युअल ट्रीट असेल.”

INOX सध्या भारतातल्या 74 शहरांमध्ये 165 मल्टिप्लेक्स आणि 705 स्क्रीन्ससह कार्यरत आहे आणि संपूर्ण भारतात 1.57 लाख आसनक्षमता आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, INOX Leisure आणि PVR यांनी देशातील सर्वात मोठी मल्टिप्लेक्स साखळी तयार करण्यासाठी विलीनीकरणाची घोषणा केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *