fbpx

T20 World Cup 2024 in new format: टी20 विश्वचषक 2024 होणार नव्या फॉरमॅटमध्ये

T20 World Cup 2024 in new format: टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धा नुकतीच ऑस्ट्रलियामध्ये पार पडली. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून इंग्लंडने दुसऱ्यांदा स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. आता या स्पर्धेची पुढील आवृत्ती 2024 मध्ये होणार आहे.

अमेरिका आणि वेस्ट इंडिज भूषविणार विश्वचषकाचे यजमानपद

2024 मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिज या विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहेत. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच अमेरिकेत या स्पर्धेचं आयोजन होणार आहे. या टी20 विश्वचषक स्पर्धेसाठीआयसीसीनं (ICC) या स्पर्धेसाठी काही नियम बदलले आहेत. T20 विश्वचषक 2022 मधील टॉप-8 संघ या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले आहेत. या ८ संघांव्यतिरिक्त नवीन फॉरमॅटच्या पूर्ततेसाठी २०२२ च्या गुणतालिकेतील पुढील २ संघ अफगाणिस्तान आणि बांगलादेशला थेट प्रवेश दिला गेला आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिज आणि अमेरिका या विश्वचषकाचे आयोजन करत आहेत त्यामुळे अमेरिका आणि वेस्ट इंडिजलाही यजमान संघ म्हणून स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे.

2024 च्या टी20 विश्वचषकासाठी एकूण 12 संघ निश्चित करण्यात आले आहेत. स्पर्धेत एकूण 20 संघांचा समावेश असणार आहे. या 20 संघांतील 12 संघ निश्चित झाले आहेत आणि उर्वरीत 8 संघ पात्रता फेरीनंतर निश्चित होणार आहेत.

हे ही वाचा: आयपीएल २०२३ चे वेळापत्रक

T20 World Cup 2024 in new format: कसं असेल फॉरमॅट?

टी20 विश्वचषक 2024 एका नवीन फॉरमॅट (T20 World Cup 2024 in new format) मध्ये खेळविली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 20 संघ असतील. या 20 संघांची प्रत्येकी 5 च्या एकूण 4 गटात विभागणी केली जाईल. या चारही गटांतील टॉप-2 संघ सुपर-8 फेरीसाठी पात्र ठरतील. अशाप्रकारे टी-20 विश्वचषक 2024 मध्ये सुपर-12 फेरी न होता त्याऐवजी सुपर-8 फेरी होईल. T20 विश्वचषक 2024 मध्ये एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. या 55 सामन्यांपैकी सुमारे काही सामने अमेरिकेत, तर उर्वरित सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत. 2022 च्या टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलध्ये भारतीय संघाचा पराभव झाला होता. आता आगामी विश्वचषकात भारताकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *