Smart Stations for Bullet Trains : बुलेट ट्रेन स्थानके आता स्मार्ट होणार

Smart Stations for Bullet Trains : मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेतील (बुलेट ट्रेन) स्थानके ‘स्मार्ट’ होणार आहेत. याअंतर्गत स्थानकांच्या आजूबाजूच्या क्षेत्राचा विकास साधला जाणार आहे. त्याबाबत मंगळवारी महत्त्वाची बैठक मुंबई महागर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कार्यालयात पार पडली.

Smart Stations for Bullet Trains : बुलेट ट्रेनसाठी मार्गिकेची उभारणी

नॅशनल हायस्पीड रेल्वे कंपनी लिमिटेड (एनएचएसआरसीएल) ही विशेष उपक्रम कंपनी जपानी गुंतवणूक एजन्सीच्या (जायका) सहकार्याने १.०८ लाख कोटी रुपये खर्चून बुलेट ट्रेनसाठी मार्गिकेची उभारणी करत आहेत. या ५०८ किमी मार्गिकेवर १२ स्थानके आहेत. त्यापैकी बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर ही चार स्थानके महाराष्ट्रात आहेत. त्यांची लांबी १५६ किमी इतकी आहे. या स्थानक परिसरांचा विकास राज्य सरकार व महापालिकांच्या सहकार्याने होणार आहे. त्यामध्ये एमएमआरडीएची भूमिका मोलाची असेल. यासाठीच स्थानक परिसर व क्षेत्र विकासासंबंधीच्या बैठकीला एमएमआरडीए कार्यालयातून सुरुवात झाली आहे.

एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, या स्थानकांच्या क्षेत्राचा विकास केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या ‘स्मार्ट’ या उपक्रमांतर्गत होणार आहे. त्यासंबंधीच्या बैठकीत शहरी कार्य मंत्रालय, नगर व देश नियोजन संघटना (टीसीपीओ), मुंबई रेलविकास महामंडळ, एनएचएसआरसीएल, राज्य सरकार, एमएमारडीए, ठाणे महापालिका, वसई विरार महानगरपालिका, जपान दूतावास, जायका मुख्यालय, जायका भारत कार्यालय येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हे ही वाचा : कोकण रेल्वेमार्गावर ‘वंदे भारत’ एक्सप्रेसची चाचणी

राज्यातील चार स्थानक परिसरांचा विकास

साबरमती, सूरत, विरार आणि ठाणे या स्थानकांच्या परिसरातील विकासासाठी आदर्श नियोजन हे जपानमधील स्थानकांसाठी अवलंबलेल्या अनुभव आणि पद्धतींबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. राज्यातील चार स्थानक परिसरांचा विकास साधून प्रकल्पाचा संपूर्ण आर्थिक लाभ मिळावा आणि स्थानकाला अभिसरण केंद्र म्हणून विकसित करावे, यासंबंधी चर्चा करण्यात आली. या स्थानक विकासाची सुरुवात बीकेसी या पहिल्या स्थानकापासून होणार असल्यानेच एमएमआरडीएची भूमिका यांत महत्त्वाची असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *