Shivok-Rangpo Railway: सिक्कीमला रेल्वे नेटवर्कशी जोडणारा, पर्यटन आणि विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने अत्यंत महतवाच्या मानल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेच्या शिवोक-रंगपो रेल्वे लाईन (Shivok Rangpo Railway line) प्रकल्पावर सध्या जोरात काम सुरू आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पातील महत्त्वाची बाब म्हणजे 86 टक्के मार्ग बोगद्यांद्वारे कव्हर केला जाणार आहे.
बांधकाम वेगाने सुरू
सिक्कीमला रेल्वे नेटवर्कशी जोडण्यासाठी शिवोक-रंगपो रेल्वे लाईन प्रकल्पाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाच्या पूर्ततेमुळे या प्रदेशाच्या पर्यटन आणि सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळणार असतानाच हा प्रकल्प धोरणात्मक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा ठरणार आहे.
Shivok-Rangpo Railway: कसा आहे हा प्रकल्प?
पश्चिम बंगालमधील शिवोक (WB) ते सिक्कीममधील रंगपोपर्यंत या रेल्वे मार्गाची एकूण लांबी 44.96 किमी असेल. ४१.५५ किमीचा रेल्वे मार्ग पश्चिम बंगालमध्ये आणि ३.४१ किमीचा सिक्कीममध्ये असेल. विशेष म्हणजे या प्रकल्पातील महत्त्वाची बाब म्हणजे 86 टक्के मार्ग बोगद्यांद्वारे कव्हर केला जाणार आहे. एकूण 14 बोगदे बांधण्यात येणार आहेत. सर्वात लांब बोगदा 5.27 किमी असेल. सर्वात लहान बोगद्याची लांबी 538 मीटर असेल. याशिवाय या प्रकल्पांतर्गत 13 पूल बांधण्यात येणार आहेत. तसेच पाच रेल्वे स्थानके असतील. 9 ऑगस्ट 2022 पर्यंत, 14 बोगद्यांचे 52.32 टक्के बांधकाम झाले. त्याचप्रमाणे 13 पुलांचे बांधकाम 33 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे.
हे ही वाचा: 3 वर्षानंतर नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पुन्हा सुरू
हे ही वाचा: वंदे भारत ट्रेन आता काश्मीरमध्येही पर्यंत धावणार, आयफेल टॉवरपेक्षा उंच पूल तयार
संरक्षणाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा
सिक्कीमला लागून चीनची सीमा आहे. त्यामुळे हा प्रकल्प संरक्षणाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. रेल्वे कनेक्टिव्हिटीनंतर भारतीय लष्कर या भागात लवकर जाऊ शकते. ईशान्य राज्याच्या पूर्वेला भूतान, पश्चिमेला नेपाळचा प्रांत क्रमांक 1 आणि दक्षिणेला पश्चिम बंगालच्या सीमा देखील आहेत. हे सिलीगुडी कॉरिडॉर (जो बांगलादेशच्या सीमेला लागून आहे) जवळ आहे.
भारतीय राज्यांपैकी सिक्कीम हे सर्वात कमी लोकसंख्या असलेले आणि दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य आहे. हे पूर्व हिमालयात वसलेले आहे. हे राज्य त्याच्या जैवविविधतेसाठी (अल्पाइन आणि उपोष्णकटिबंधीय हवामानासह) उल्लेखनीय आहे आणि भारतातील सर्वोच्च शिखर (आणि जगातील तिसरे सर्वोच्च) कांगचेनजंगा येथे देखील आहे. राज्याची राजधानी गंगटोक आहे. सिक्कीमचा जवळपास 35% भाग कांगचेनजंगा राष्ट्रीय उद्यानाने व्यापलेला आहे, ज्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहे.