fbpx

Shivaji Maharaj History In Marathi : मराठीत ऐतिहासिक चित्रपटांची लाट; १५ चित्रपटांवर काम सुरू

Shivaji Maharaj History In Marathi : गेल्या चार-पाच वर्षांत मराठी मनोरंजनसृष्टीतून अनेक इतिहासपट तयार झाले. आगामी काळातही काही येणार आहेत. इतिहासातल्या अनेक घटना-प्रसंगांवर यंदाही सिनेमे व सीरीजचं काम जोमानं सुरू आहे. या निमित्तानं सतरावं शतक पुन्हा रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे.

Shivaji Maharaj History In Marathi : ऐतिहासिक चित्रपटांची लाट

मराठी सिनेसृष्टीत सध्या ऐतिहासिक चित्रपटांची लाट आहे. इतिहासातील विविध विषयांवर आधारलेले एका मागोमाग एक विविध चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहेत. बॅाक्स ऑफिसवरही हे चित्रपट चांगली कमाई करत असल्याने मराठी निर्मात्यांनी ऐतिहासिक चित्रपटांवर जवळपास सव्वाशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, सध्या १५ ऐतिहासिक चित्रपट निर्मिती प्रक्रियेत असून, आणखी काहींची योजना आखली जात आहे.

आगामी मराठी ऐतिहासिक चित्रपट

या आगामी चित्रपटांमध्ये दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरचा ‘सुभेदार’, ‘छावा – दि ग्रेट वॉरियर’, ‘आग्य्राहून सुटका’ या तीन चित्रपटांसोबत महेश मांजरेकरांचा ‘वीर दौडले सात’, रवी जाधव यांचा ‘बाल शिवाजी’, विजय राणेंचा ‘सिंहासनाधिश्वर’, अजय आरेकर यांचा ‘रामशेज’ व ‘मुरारबाजी’, राहुल जाधव यांचा ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’, स्नेहल तरडे यांचा ‘फुलवंती’, डॅा. अमोल कोल्हेंचे शिवप्रताप वाघनख व शिवप्रताप वचपा तसेच आणखी तीन चित्रपटांचे काम सुरू आहे. भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित भव्य-दिव्य चित्रपट बनविण्याचे स्वप्न असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि रितेश देशमुख यांनीही महाराजांवरील चित्रपटांची घोषणा केली आहे.

ऐतिहासिक चित्रपटांचे बजेट अधिक’

ऐतिहासिक चित्रपटांमध्ये जुना काळ उभारण्यासाठी बजेटमधील बराचसा भाग खर्च होतो. व्हिज्युअल इफेक्ट्स व काॅम्प्युटर ग्राफिक्सद्वारे शक्य होत असले तरी त्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. वेशभूषा, हत्ती, घोडे, शस्त्रे या महत्त्वपूर्ण गोष्टींवरील खर्च टाळता येत नाही. एका ज्युनियर आर्टिस्टवर दिवसाला १५०० ते २००० रुपये खर्च ५०० ज्युनियर आर्टिस्टसोबत एक दिवस शूटचे बजेट दिवसाला ८ ते १० लाख जितके दिवस शूट तितके बजेट वाढते.

हे ही वाचा : ’बाल शिवाजी’ ची घोषणा. महाराजांच्या भूमिकेत दिसणार हा कलाकार

तालीम आणि प्रशिक्षणासाठी द्यावा लागतो भरपूर वेळ

ऐतिहासिक चित्रपटासाठी मुख्य कलाकारांना तालीम आणि प्रशिक्षणासाठी भरपूर वेळ द्यावा लागत असल्याने कित्येकदा त्यांच्या मानधनातही वाढ होते. इतर कलाकार-तंत्रज्ञांवरील खर्च वेगळाच असतो. शूटिंग पूर्ण झाल्यावर प्री-प्रोडक्शन, पब्लिसिटी, प्रमोशनल ॲक्टिव्हीटीज, डिस्ट्रीब्युशन यासाठी दीड ते दोन कोटींचे बजेट असते. त्यामुळे एका ऐतिहासिक चित्रपटासाठी कथेच्या गरजेनुसार पाच ते सात कोटींहून अधिक बजेट ठेवावे लागते.

‘वीर दौडले सात’चे बजेट ५० कोटींच्याही पुढे

या विषयी बोलताना निर्माता, दिग्दर्शक,अभिनेते महेश मांजरेकर म्हणाले, “मराठीसह हिंदीत बनणाऱ्या ‘वीर दौडले सात’चे बजेट ५० कोटींच्याही पुढे जाईल. सात वर्षांपासून हा चित्रपट बनविण्याच्या प्रयत्नान होतो, पण बजेटमुळे थांबावे लागले. कुठेही तडजोड करायची नव्हती. आज बरेच दिग्दर्शक वेगवेगळे विषय हाताळत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगासमोर आणत असल्याचा आनंद आहे. बजेटच्या जोडीला खूप मेहनत घ्यावी लागते. माझ्यासह सर्वांनीच चांगले चित्रपट बनवावेत आणि सर्वच चित्रपट चालावेत ही इच्छा आहे.”

व्यावसायिक यश मिळवण्याचं मोठं आव्हान

ऐतिहासिक सिनेमांना चांगले दिवस आल्याचं बोललं जात असलं, तरी आगामी काळात व्यावसायिक यश मिळवणं, हे या कलाकृतींसमोरचं मोठं आव्हान ठरणार आहे. गेल्या दोन वर्षांत आलेली इतिहासपटांची लाट हे त्यामागचं कारण आहे. प्रेक्षक चांगल्या कलाकृतीच्या पाठीशी कायमच ठामपणे उभा राहत असला, तरी लागोपाठ इतिहासपट प्रदर्शित झाल्यावर, सगळ्यांनाच प्रेक्षकांची दाद मिळणार का, या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच देणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *