Shiv Sena Split devided families: उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय वादामुळे शिवसेनेतच नव्हे तर पक्षाच्या नेत्यांची आणि समर्थकांची कुटुंबेही दुभंगली आहेत. या राजकीय लढाईचा पहिला आणि सर्वात हाय-प्रोफाइल बळी स्वतः ठाकरे कुटुंब आहे. उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव यांचा मुलगा जयदीप हा उद्धव ठाकरेंसोबत असला तरी जयदेव यांच्या पूर्व पत्नी स्मिता आणि त्यांचा पुतण्या निहार शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेतील विभाजनाचा परिणाम पक्षातल्या अनेक कुटुंबांवर झालेला दिसून येत आहे.
Shiv Sena Split devided families: आनंद दिघे यांच्या कुटुंबात तेढ
शिवसेनेतील फुटीचा परिणाम ठाण्यातील पक्षाचे बलाढ्य समर्थक आनंद दिघे यांच्या कुटुंबावरही होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांना आपले राजकीय गुरू मानतात. आनंद दिघे हे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शिवसेना नेते होते. आनंद दिघे यांनी त्यांच्या समाज कार्य आणि मेहेनतीच्या जोरावर ठाणे जिल्ह्यात शिव सेनेचे वर्चस्व प्रस्थापित केले. आता हे कुटुंबही दुभंगलेले दिसते. उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांचे पुतणे केदार यांची पक्षाच्या ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे, तर त्यांची मावशी आणि आनंद दिघे यांची बहीण अरुणा गडकरी या गेल्या महिन्यात वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे झालेल्या शिवसेना गटाच्या दसरा मेळाव्यात दिसल्या होत्या.
हे ही वाचा: ५० खोके घेतल्याच्या आरोपाविरोधात मानहानीचा दावा, शिंदे गटाचा मोठा निर्णय!
कीर्तिकर कुटुंबातही फूट
शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला उद्धव यांची बाजू सोडून शिंदे गटात प्रवेश केल्याने कीर्तीकर कुटुंबातही फूट पडली आहे. गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरीही त्यांचा मुलगा अमोल अजूनही उद्धव ठाकरेंसोबत आहे.
नंदुरबारमध्ये शिवसेनेच्या जिल्ह्यातील पराडके कुटुंबही पक्षातील फुटीतून सुटू शकले नाही. शिवसेना जिल्हाप्रमुख आणि नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य गणेश पराडके यांनी ठाकरे गटाची बाजू घेण्याचा निर्णय घेतला आहे, तर त्यांचे मोठे बंधू विजय जे देखील परिषदेचे सदस्य आहेत, ते आता शिंदे गटाचे सदस्य आहेत.
दोन बोटींवर चढण्याचा प्रयत्न
उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. तेव्हापासून ठाकरे आणि शिंदे हे दोन्हीही गट एकमेकांवर सतत कुरघोडी करतांना दिसत आहेत. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांची कोणता झेंडा घेऊ]हाती अशी अवस्था झाली आहे. कुटुंबात असलेले हे दोन मतप्रवाह आणि त्यामुळे आलेलीपडलेल्या या फुटीला अंधारात असलेली जनता आणि या दोन्ही गटांचे कार्यकर्ते याला वैचारिक आवरण देत असले तरी राजकीय फायद्यासाठी ते केले जात असल्याचे मुंबई विद्यापीठाचे डॉ.संजय पाटील यांचे म्हणणे आहे. या निर्णयांमध्ये व्यावहारिकता आणि स्थानिक राजकीय समीकरणे भूमिका बजावत आहेत.
राज्यातील राजकीय परिस्थिती अजूनही अस्थिर असल्याने अनेक जण एकाच वेळी दोन बोटींवर बसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची पावले नक्की कुठल्या बोटीवर रहातील ते येणारा काळच ठरवेल.