Shikhar explained why Rahul led in ZIM Series: झिम्बाब्वे मालिकेसाठीही शिखर धवनची कर्णधारपदी निवड करण्यात आली होती, पण अखेरच्या क्षणी त्याला का हटवण्यात आले याबाबत त्याने खुलासा केला आहे.
न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिका
२५ नोव्हेंबरपासून भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना ३० नोव्हेंबरला होणार आहे. रोहित शर्मा या दौऱ्यावर संघाचा भाग नसल्यामुळे संघाची कमान शिखर धवनच्या हाती आहे. यापूर्वी, धवनने वेस्ट इंडिज दौऱ्यावर आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या घरगुती मालिकेत भारताचे नेतृत्व केले होते आणि धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मालिका जिंकली होती. पण आशिया चषकाआधी झालेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेत शेवटच्या क्षणी त्याला कर्णधारपदावरून हटवून केएल राहुलकडे संघाची कमान सोपवण्यात आली होती. राहुल तेव्हा दुखापतीतून सावरून पुनरागमन करीत होता. शेवटच्या क्षणी धवन ऐवजी अचानक राहुलला कर्णधार केल्याने (Shikhar explained why Rahul led in ZIM Series) त्याबद्दल बरीच चर्चा झाली होती.
हे ही वाचा: टी20 विश्वचषक 2024 होणार नव्या फॉरमॅटमध्ये
Shikhar explained why Rahul led in ZIM Series: शिखर धवनचे स्पष्टीकरण
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी पत्रकार परिषदेत त्याला झिम्बाब्वे दौर्याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने सडेतोड उत्तर दिले. शिखर धवन म्हणाला की, “तुम्ही एक चांगला प्रश्न विचारला आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर मला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे. हे माझ्यासाठी आव्हान आहे. आमच्याकडे तरुण खेळाडू अधिक आहेत त्यामुळे त्यांना जास्त वाव दिल्यास अधिक जास्त पर्याय संघाकडे उपलब्ध होऊ शकतात.
Shikhar explained why Rahul led in ZIM Series: धवन म्हणाला, “झिम्बाब्वे दौऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास केएल राहुल आमच्या संघाचा उपकर्णधार होता, तो परत आला तेव्हा मी लक्षात ठेवले की त्याला आशिया चषकला जायचे आहे. म्हणून मी एक पाऊल मागे येत त्याला कर्णधारपद घेण्यास सांगितले. आशिया चषकादरम्यान रोहितला दुखापत झाली असती तर केएलला नेतृत्व करण्यास सांगितले असते, त्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्यात त्याने सराव करणे चांगले आहे असे मला वाटले. मला याबाबत कुठलाही राग नाही किंवा मी दुखी नाही. आपल्या बाबतीत जे काही घडत असते ते सर्वकाही यौग्य असते असे मला वाटते. त्यानंतर नशिबाने दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी माझ्यावर पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे खूप आनंदी आहे.
विश्वचषक २०२३ बाबत केले भाष्य
रोहित शर्मा आणि केएल राहुलसारखे बदली खेळाडू संघासाठी डोकेदुखी ठरू शकतात का यावर धवन म्हणाला: “आम्ही काही काळापासून चांगली कामगिरी करत आहोत. माझ्याबद्दल बोलायचे तर मला सातत्याने चांगली कामगिरी करत राहावी लागेल. मला माहित आहे की की जोपर्यंत मी परफॉर्म करेन तोपर्यंत ते माझ्यासाठी चांगले राहील. मला वाटते की ही एकदिवसीय मालिका माझ्यासाठी 2023 विश्वचषकात स्थान मिळवण्यासाठी स्पर्धेत रहाण्याची सर्वोत्तम संधी आहे. मला तंदुरुस्त राहायचे आहे आणि चांगली फलंदाजी करायची आहे जेणेकरून मी संघात स्थान मिळवू शकेन.”
डिसेंबरमध्ये शिखर धवन ३७ वर्षांचा होणार आहे. या आधीही त्याला त्याच्या एकदिवसीय वर्ल्ड कप मधील सहभागाबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर धवन म्हणाला होता, “मी किती काळ क्रिकेट खेळणार आहे हे मला माहीत नाही, पण सध्या माझे सर्वात मोठे लक्ष्य २०२३ च्या विश्वचषकात खेळणे आहे. “प्रत्येक वेळी मी खेळतो तेव्हा मी देवाचे आभार मानतो आणि तंदुरुस्त राहण्याची इच्छा करतो. माझे एक सुंदर करिअर आहे आणि मी नेहमीच माझे ज्ञान तरुणांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो. आता माझ्या खांद्यावर नवीन जबाबदारी आली आहे, पण मी या संधीचा आनंद घेत आहे आणि पुढे आव्हाने आहेत.”