Saudi Arabia stuns Argentina: सध्या सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाचा संघ विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. या संघात लिओनेल मेस्सी सारखे स्टार खेळाडू आहेत जे कुठलाही सामना एकहाती फिरवू शकतात. त्यामुळे आज झालेल्या सौदी अरेबिया विरुद्धच्या सामन्यात अर्जेंटिनाचेच पारडे जड मानले जात होते.
Saudi Arabia stuns Argentina: मोठा धक्का
सौदी अरेबिया आणि अर्जेंटिना यांच्यात झालेल्या या सामन्यात अर्जेंटिना सौदी अरेबियावर सहज मात करेल असे वाटत होते आणि त्यांची सुरुवातही जबरदस्त होती. कर्णधार लिओनेल मेस्सीच्या गोलनंतरही अर्जेंटिनाला आजच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. हा या विश्वचषकातील सर्वात मोठा धक्का (Saudi Arabia stuns Argentina) असल्याचे म्हटले जात आहे. कारण पण या सामन्यात अर्जेंटिनाला १-२ असा पराभव पत्करावा लागला.
हे ही वाचा: इक्वेडोरची ऐतिहासिक सुरुवात! कतारला हरवून केला ‘हा’ मोठा विक्रम
अर्जेंटिनाची दमदार सुरुवात आणि आक्रमक खेळ
या सामन्याची दमदार सुरुवात अर्जेंटिनाने केली. कारण मेस्सीला या सामन्यात सुरुवातीला चांगला सुर गवसला होता. या सामन्याच्या १०व्या मिनिटाला त्याने गोल केला आणि संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. त्यामुळे आता अर्जेटिनाचा संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. मेस्सीच्या या गोलनंतर अर्जेंटिनाचे मनोबल कमालीचे उंचावले होते. या गोलनंतर अर्जेटिनाच्या संघाने अधिक आक्रमक खेळ केला पण त्यांना आणखी गोल करता आले नाहीत.
तब्ब्ल 7 वेळा ऑफसाइड
अर्जेंटिनाने सुरुवातीला चांगला खेळ केला. पण संघाच्या खेळाडूंनी तब्ब्ल 7 वेळा ऑफसाइड केले. अर्जेंटिनाच्या लोटारो मार्टिनेजने दुसरा गोल जवळपास केला होता. पण पंचांनी ऑफसाइडमुळे तो रद्दबातल ठरवला. मेसीचाही एक गोल ऑफसाइड झाला. अर्जेन्टिनाला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही पण त्यांनी पहिल्या सत्रात आपली आघाडी कायम ठेवली होती. सौदीच्या बचावफळीने दमदार खेळ केला आणि अर्जेंटिनाची आघाडी वाढू दिली नाही.
अर्जेंटिनाचे वर्चस्व असूनही हाफ टाईम पर्यंत अनेक संधीचं रूपांतर जेव्हा गोल मध्ये होऊ शकलं नाही तेव्हा मात्र हा सामना एकतर्फी होणार नाही याची चाहूल प्रेक्षकांना लागली होती. तरीही अर्जेटिनाचेच पारडे जड समजले जात होते. पण दुसऱ्या सत्रात मात्र संपूर्ण खेळ बदललल्याचे पाहायला मिळाले.
दुसऱ्या सत्रात सौदीची चमकदार कामगिरी
दुसऱ्या सत्रात सौदीच्या संघाने मात्र दमदार कामगिरी केली आणि त्यावर अजूनही बऱ्याच जणांचा विश्वास बसत नाही. कारण सौदी अरेबियाच्या सालेह अलशेहरीने उशीरा डाईव्ह करणार्या क्रिस्टियन रोमेरोला चकवत सामन्याच्या ४८ व्या मिनिटाला पहिला गोल केला आणि अर्जेटिनाशी बरोबरी केली.
बरोबरी झाल्यावर सौदीच्या संघाचे मनोबल उंचावले आणि त्यांनी अधिक आक्रमकपणे खेळ केला. पहिला गोल केल्यावर फक्त तीन फक्त पाच मिनिटांमध्ये सौदीच्या सालेम अल्दवसारी याने दुसरा गोल केला आणि त्यांनी सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. सामन्यात सौदी आघाडी घेईल, असे कोणालाही वाटले नव्हते. पण या आघाडीनंतर मात्र त्यांचे मनोबल उंचावले. या नंतर सौदीच्या समर्थकांना जणू कंठ फुटला आणि स्टेडियममध्ये त्यांचा आवाज घुमू लागला.
Saudi Arabia stuns Argentina: दुसऱ्या गोलनंतर बचावात्मक पावित्रा
दुसऱ्या गोलनंतर मात्र सौदीने आपल्या खेळात मोठा बदल केला. सौदीने या गोलनंतर आक्रमण कमी केले आणि बचावावर अधिक भर दिला. कारण जर त्यांच्याविरोधात एक गोल झाला असता तरी सामना बरोबरीत सुटला असता. ही गोष्ट सौदीच्या संघाने आपल्या रणनितीमध्ये उतरवली आणि त्यांनी अर्जेटीनावर मोठा विजय (Saudi Arabia stuns Argentina) साकारला.
अर्जेंटिनाचा विजयरथ सौदीने रोखला
या पराभवामुळे अर्जेंटिनाचा सलग 36 सामन्यांत विजयी होण्याची मालिका खंडीत झाली आहे. अर्जेंटिनाचे आतापर्यंत खेळण्यात आलेल्या 36 सामन्यांपैकी 25 सामन्यांत विजय मिळवला होता. तर 11 सामने ड्रॉ झाले होते.
आता अर्जेंटिनाचे आता केवळ 2 सामने शिल्लक राहिले आहेत. राउंड ऑफ 16 मध्ये जाण्यासाठी त्यांना हे दोन्ही सामने कोणत्याही स्थितीत जिंकावे लागतील. अर्जेंटिनाचा पुढचा सामना 27 नोव्हेंबर रोजी मेक्सिकोशी होईल. त्यानंतर 30 नोव्हेंबर रोजी ते पोलंडशी दोन हात करेल. सौदी अरेबियाचा विश्वचषकातील हा अवघा तिसरा विजय आहे.
या मोठ्या विजयानंतर सौदी समर्थकांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. दुसरीकडे अर्जेंटिनाचे चाहते मात्र त्यांच्या विश्वचषकाच्या भविष्याबद्दल चिंतीत दिसत होते. या पराभवामुळे त्यांचं विषवचशक जिंकण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणं अवघड झालं आहे.
अर्जेंटिना-सौदी अरेबियाचे स्टार्टिंग इलेव्हन
सौदी अरेबिया (4-4-1-1): मोहम्मद अल-ओवेस (गोलकीपर) ,सऊद अब्दुलहामिद, हसन अल-तम्बाकती, अली अल-बुलायही, यासर अल-शाहरानी, मोहम्मद कन्नो, अब्दुलल्लाह अल-मल्की, सलमान अल-फराज (कर्णधार), सलेम अल-दावसारी, फिरास अल-ब्रिकन, सालेह अल-शेहरी.
अर्जेंटीना (4-2-3-1): एमिलियानो मार्टिनेज (गोलकीपर), नहुएल मोलिना, क्रिस्चन रोमेरो, निकोलस ओटामेंडी, निकोलस टैगेलियाफिको, रोड्रिगो डी पॉल, लिएंड्रो परेडेस, एलेजांद्रो गोमेज, लियोनल मेसी (कर्णधार), लौटारो मार्टिनेज, एंजल डी मारिया.