Samuh Rashtragaan: समूह राष्ट्रगीत गायनाला ठाणे पोस्ट कर्मचाऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

ठाणे, दिनांक १७ ऑगस्ट २०२२

Samuh Rashtragaan: समूह राष्ट्रगीत गायनाचे आयोजन

Samuh Rashtragaan: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता समूह राष्ट्रगीत गायनाचे (Samuh Rashtragaan) आयोजन केले होते. नागरिकांनी आहे त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करण्याचं आवाहन राज्य सरकारने केले होते. याबाबत राज्य सरकारने एक अध्यादेश काढला होता आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी यात सहभागी व्हावं असं आवाहनही राज्यसरकारतर्फे करण्यात आले होते.

राज्यातील खासगी, शासकीय तसंच इतर सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था विद्यापीठांमधील शिक्षक विद्यार्थी ह्यात सहभाग झाले.

हे ही वाचा: वृक्षवल्लीनी साजरा केला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 

ठाणे पोस्ट ऑफिस मध्ये राष्ट्रगीताचे समूह गान

ठाणे येथील पोस्ट ऑफिस मध्ये अकरा वाजून एक मिनिटांनी राष्ट्रगीताचे समूह गान (Samuh Rashtragaan) पोस्टमास्टर गायकर मॅडम, सब पोस्ट मास्टर दाभोळे सर, सर्व पोस्टमन दादा व इतर पोस्ट कर्मचारी आणि त्यांचे प्रतिनिधी राजेंद्र गोसावी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. ठाणे पोस्टच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन अत्यंत जबाबदारीने आणि उत्साहाने हा उपक्रम राबवला त्याबद्दल पोस्ट मास्टर गायकर मॅडम आणि सब पोस्ट मस्टर दाभोळे सर ह्यांनी समस्त कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

स्वांतत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने केंद्र सरकारतर्फे ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबवण्यात आले होते. त्यालाही ठाणे पोस्ट कर्मचाऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *