fbpx

कसा आहे सॅमसंग गॅलेक्सी एम 32 5 जी?

काही काळापूर्वी, दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग (Samsung) ने गॅलॅक्सी एम ३२ फाय जी (Galaxy M 32 5G) लाँच केला. ५००० mAh बॅटरी आणि Dimensity 720 प्रोसेसरसह सुसज्ज असलेला हा स्मार्टफोन १६,९९९ रुपयांपासून उपलब्ध आहे. या फोनचा लूक आणि परफॉर्मन्स कसा आहे ? चला जाणून घेऊया.

डिस्प्ले

या फोन मध्ये ६.५ इंचाचा HD TFT डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट ६० Hz आहे. फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आले आहे. तसेच कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ चे संरक्षण देण्यात आले आहे. तुम्ही HD+ रिझोल्यूशन मध्ये व्हिडीओज पाहू शकाल. ब्राइटनेस जास्त असताना सूर्यप्रकाशात डिस्प्ले बघायला हरकत नाही.

डिझाईन

फोनचा बॅक पॅनल स्मूथ फिनिशसह येतो. त्याच्या मागील पॅनलवर ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. मागील पॅनलवरच कॅमेरा सेन्सर बसवण्यात आले आहेत. फोनच्या उजव्या बाजूला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम बटणे दिली आहेत. त्याच वेळी, सिम ट्रे डाव्या बाजूला आहे. स्पीकर ग्रिल, चार्जिंग स्लॉट आणि हेडफोन जॅक फोनच्या तळाशी आहेत.

फोनच्या बॅक पॅनेलने त्याला प्रीमियम लुक दिला आहे. फोनचे डिझाईन तितके युजर फ्रेंडली नाही. फोनच्या बाजू बऱ्यापैकी जाड आहेत त्यामुळे फोन एका हाताने वापरणे जवळपास अशक्य आहे. आणि जर तुम्ही त्यावर कव्हर लावले तर वापर करताना फोन आणखी जड वाटेल. एकुणच, डिझाईनबद्दल बोलयचे तर त्याला फार चांगले म्हणता येणार नाही.

हे ही वाचा: गुगलचा वाढदिवस – २७ संप्टेंबर

परफॉर्मन्स

हा फोन ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम मध्ये उपलब्ध आहे. त्यात १२८ जीबी स्टोरेज दिले गेले आहे, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे १ टीबी पर्यंत वाढवता येते. फोनवर मल्टीटास्किंग करताना आम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागला नाही. आम्ही फोनवर संगीत ऐकले आणि मेल देखील पाठवले. एकाच वेळी अनेक ऍप्स वापरले. परंतु, आम्हाला या फोनमध्ये कोणत्याही प्रकारच्या हँग समस्येचा सामना करावा लागला नाही. जर तुम्ही गेमर असाल तर तुम्हाला या फोनमध्ये गेमचा तितका आनंद घेता येणार नाही. परंतु, जर तुम्ही त्यात सबवे सर्फर किंवा पोकेमॉन गो सारखे हलके खेळ खेळलात तर तुम्ही या फोनवर गेमिंगचा आनंद घेऊ शकाल.

जर तुम्हाला तुमचे ऑफिसचे आणि सर्व वैयक्तिक काम फोनवरच करायला आवडत असेल तर फोन तुम्हाला निराश करणार नाही. फोनमध्ये दिलेले फिंगरप्रिंट सेन्सरही चांगले काम करते. फोन लगेच अनलॉक होतो.

कॅमेरा आणि फोटोग्राफी

या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा आहे. त्याचा प्राथमिक सेन्सर ४८ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, ज्याचे अपर्चर १.८ आहे. दुसरा ८ मेगापिक्सलचा सेन्सर आहे, ज्याचा अपर्चर F २.२ आहे. तिसरा ५ मेगापिक्सलचा सेन्सर आहे ज्याचे अपार्चर F २.४ आहे. चौथा सेन्सर २ मेगापिक्सेलचा आहे, ज्याचा अपर्चर F २.४ आहे. फोटोग्राफीबद्दल सांगायचे तर, या फोनवरून दिवसाच्या प्रकाशात चांगले फोटो काढता येतात. सर्व मोडसह आपण चांगले फोटो क्लिक करू शकाल. त्याच वेळी, व्हिडिओ देखील स्मूथ बनविण्यात सक्षम असतील. परंतु, जर तुम्हाला कमी प्रकाशात म्हणजेच रात्री किंवा संध्याकाळी फोटो काढायचे असतील तर मात्र तुम्ही निराश व्हाल. यामध्ये तुम्हाला खूप नॉईस मिळेल. दिवसाच्या प्रकाशात काढलेल्या फोटोंमध्ये डिटेल्स असतील. तसेच, हे फोटो सुद्धा छान असतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याचा Back कॅमेरा ऑटोफोकसला देखील सपोर्ट करतो.

बॅटरी बॅक अप

या फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी आहे जी १५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनवर ब्राउझ केले, ओटीटी ऍप्सवर कन्टेन्ट पहिले, ईमेल्स पाठवले, गेमिंग केले, फोटोग्राफी केली तरी एक दिवस चार्जिंग राहील. पण फक्त कॉल किंवा मेसेजसाठी वापरला तर बॅटरी तुम्हाला १.५ दिवसांपेक्षा जास्त काळ सपोर्ट करू शकेल.

फोनच्या बायोमेट्रिक्सबद्दल बोलायचे झाले तर त्यात फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक देण्यात आले आहेत. दोन्ही सेन्सर्सनी चांगले काम केले. फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक फोन त्वरित अनलॉक केला.

थोडक्यात, फोन डिस्प्ले, कॅमेरा आणि वजन या फीचर्स मध्ये साधारण आहे. पण, फोनमध्ये दिलेली 5G कनेक्टिव्हिटी, फोनची बॅटरी फोनचे प्लस पॉइंट म्हणता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *