fbpx

Samruddhi Mahamarg Phase 1: समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे ११ डिसेंबर २०२२ ला उदघाटन

Samruddhi Mahamarg Phase 1: नागपूर ते शिर्डी या ७०१ किमीच्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ११ डिसेंबर २०२२ पासून कार्यान्वित होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी दरम्यान 520 किमीचा आहे ज्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते होणार आहे. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर १० तासांऐवजी ५ तासांत कापता येईल.

Samruddhi Mahamarg: उद्घाटन अनेकदा लांबणीवर

यापूर्वी अनेकदा समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) उद्घाटनाचे मुहूर्त ठरले होते मात्र, विविध कारणांमुळे उद्घाटन लांबणीवर पडले होते. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात पंतप्रधानांच्या हस्ते महामार्गाचे लोकार्पण होईल, असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधी दिले होते. त्यानुसार ११ डिसेंबरला हा सोहळा निश्चित झाल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली.

Samruddhi Mahamarg Phase 1 उद्घाटनाच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस उपस्थित राहतील. महामार्गावरील वायफड नाक्याजवळ सभास्थळ उभारण्याचे काम सुरू झाले आहे. नागपूर मेट्रोच्या विमानतळ स्थानकाच्या परिसराचेही सुशोभीकरण करण्यात येत आहे. तसेच जिल्हा व पोलीस प्रशासनामध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. आगामी काळात येणाऱ्या निवडणुका आणि यंदाचं हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्याआधीच समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे. निवडणुकांच्या पार्श्नभूमीवर मोदींचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Samruddhi Mahamarg: महत्त्वाकांक्षी प्रकल्प

महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गाचे बांधकाम 2019 मध्ये मागील भाजप सरकारच्या काळात सुरू करण्यात आले होते. ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी 2015 मध्ये पहिल्यांदा घोषणा झाल्यानंतर जुलै 2017 मध्ये भूसंपादनाचा टप्पा सुरू झाला.

महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गाचे बांधकाम 2019 मध्ये मागील भाजप सरकारच्या काळात सुरू करण्यात आले होते. ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी 2015 मध्ये पहिल्यांदा घोषणा झाल्यानंतर जुलै 2017 मध्ये भूसंपादनाचा टप्पा सुरू झाला.

समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) प्रकल्पाची एकूण किंमत 55,000 कोटी रुपये आहे आणि एमएसआरडीसीने 28,000 कोटी रुपयांचे कर्ज उभारले आहे. समृद्धी महामार्ग नागपूर, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशीम, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या १० जिल्ह्यांतून थेट जातो. पहिल्या टप्प्यात आठ जिल्हे जोडले जाणार आहेत.

समृद्धी महामार्गावर वन्यजीव संरक्षणासाठी एकूण ८० बांधकामे प्रस्तावित केली आहेत. त्याची संरचना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. वन्यजीवांचा वावर असलेल्या ठिकाणी ध्वनिरोधक ठिकाण तयार केले आहे; तर आवश्यक ठिकाणी संरक्षणभिंतीची उभारणी केल्याचे एमएसआरडीसीने सांगितले.

कसा असेल कार्यक्रम?

११ डिसेंबरला सकाळी ११ वाजता पंतप्रधानांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. विमानतळ मेट्रो स्थानकावर त्यांच्या हस्ते मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण केले जाईल आणि त्यानंतर ते समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी रवाना होतील.

हे ही वाचा: आंतरराज्यीय सीमा विवाद: या ८ राज्यांमध्ये आहेत विवाद

पंतप्रधानांची मेट्रोतून प्रवासाचीही शक्यता

नागपूर मेट्रोच्या दोन मार्गिकांचे काम पूर्ण झाले आहे. या दौऱ्यात पंतप्रधान विमानतळ स्थानक ते कस्तुरचंद पार्क या टप्प्यात मेट्रोतून प्रवास करण्याची शक्यता आहे. यासाठी विशेष डबे असणारी मेट्रो मागवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नागपूर शहरातील मेट्रोच्या दोन मार्गिकांचे काम पूर्ण झाले असून त्यांचेही उद्घाटन खोळंबले आहे. आता पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात त्यांच्या हस्ते या मार्गिकांचे उद्घाटनही केले जाणार असल्याचे सांगण्यात येते. पंतप्रधानांचे नागपूरला आगमन झाल्यावर मेट्रोच्या विमानतळ स्थानकाहून कस्तुरचंद पार्क स्थानकापर्यंत मेट्रोतून प्रवास करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी विशेष डबे असणारी मेट्रो मागवण्यात आल्याची माहिती आहे. या बाबत अजून अधिकारीकरित्या पुष्टी करण्यात आलेली नाही.

११ लाख ३१ हजार झाडांची लागवड होणार

समृद्धी महामार्गामध्ये दोन लाख ३६ हजार झाडे बाधित झाली. त्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा ११ लाख ३१ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. सपूर्ण प्रकल्पाच्या हद्दीत झाडे लावणे, सुशोभीकरण करणे, सिंचन व्यवस्था करणे, त्याशिवाय वृक्षलागवडीची पाच वर्षे देखभाल-दुरुस्ती करण्याचे कामही केले जाणार आहे.

‘समृद्धी’मार्गाविषयी ठळक माहिती

  • मुंबई ते नागपूर अंतर ८ तासांत पार करण्याचे उद्दिष्ट
  • ७०१ किमी लांबीचा महामार्ग प्रकल्प
  • १० जिल्ह्यांमधील ३९० गावांना जोडणारा महामार्ग
  • खर्च – ५५ हजार ३३५ कोटी
  • मार्गिका – ३*३
  • वाहन वेगमर्यादा – १५० किमी प्रतितास (डोंगराळ भागात १२० किमी)
  • पहिला टप्पा – ५२० किलोमीटर
  • रस्त्यांची रुंदी – १२० मीटर (डोंगराळ भागात ९० मीटर)
  • इंटरचेंज – २४
  • रस्त्यालगतची नवनगरे – १८
  • मोठे पूल – ३३
  • लहान पूल – २७४
  • बोगदे – ६
  • रेल्वेओव्हर ब्रिज – ८
  • फ्लायओव्हर – ६५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *