समंथा रुथ प्रभूने शेअर केले तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर

चतुर्थीच्या मुहूर्तावर चाहत्यांना दिले सरप्राईज

सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही भारतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या ऑनस्क्रीन अभिनयाने आणि ऑफस्क्रीन अपिअरन्सेसने चाहत्यांची मने जिंकत असते. तिच्या प्रत्येक हालचालीवर चाहते बारीक लक्ष ठेवून असतात. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर, सामंथाने समाज माध्यमावर एक पोस्ट केली आणि तिच्या चाहत्यांना एक छान सरप्राईज दिले. तिने तिच्या आगामी ‘यशोदा’ (Yashoda) चित्रपटाचे या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले. ह्या पोस्टर वरून तिच्या ‘यशोदा’ मध्ये तिचा लूक कसा असेल ह्याचा थोडा फार अंदाज आला आहे.

हे ही वाचा: 32 वर्षांनंतर काश्मीरमध्ये मल्टिप्लेक्स सिनेमा सुरु

असे आहे चित्रपटाचे पोस्टर

समांथाने शेअर केलेल्या पोस्टर मध्ये ती महिलांच्या गर्दीमध्ये उभी असेलेली दिसत आहे. तिने एक काळा प्लेन टी-शर्ट आणि हुडी परिधान केली आहे आणि तरीही ती चारचौघातही उठून दिसत आहे कारण तिच्या चेहऱ्यावर जखमांच्या काही खुणा आहेत. पोस्टर वरून सामंथा ह्या चित्रपटात ऍक्शन करणार आहे असे वाटते.

सर्वाधिक लोकप्रिय महिला स्टार

सामंथाच्या ‘द फॅमिली मॅन 2’ मधील तगड्या परफॉर्मन्सला आणि पुष्पामधल्या ‘ओ अनातावा’ या सेन्स्युस डान्स नंबरला अजूनही प्रेक्षक विसरलेले नाहीत. हे गाणे रिलीज होऊन 8 महिने उलटून गेले तरीही ती ‘भारतातील सर्वाधिक लोकप्रिय महिला स्टार’ (Most Popular Female Star of India) च्या यादीत अव्वल स्थानावर आहे. यावरून तिच्या लोकप्रियतेचा अंदाज तुम्हाला नक्कीच येईल.

योशोदा शिवाय सामंथा ‘शाकुंतलम’, ‘कुशी’, ‘सिटाडेल’ आणि काही बिग-बाजेट प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *