Ruturaj Gaikwad 7 sixers in one over: युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने एका षटकात सात षटकार खेचून एक नवा इतिहास रचला. विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या गायकवाडने उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात एका षटकात सात षटकार ठोकले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हा पराक्रम करणारा तो जगातला पहिला फलंदाज ठरला आहे.
Ruturaj Gaikwad 7 sixers in one over: गायकवाडचा पराक्रम
महाराष्ट्राच्या डावाच्या 49व्या षटकात गायकवाडने हा पराक्रम केला. शिवा सिंगच्या या षटकात एक चेंडू नो बॉल होता. अशा प्रकारे हे षटक सात चेंडूंचे होते आणि गायकवाडने या सातही चेंडूंवर षटकार (Ruturaj Gaikwad 7 sixers in one over) ठोकले.
भारतासाठी एक वनडे आणि नऊ टी-२० सामने खेळलेल्या गायकवाडने या डावात 159 चेंडूत नाबाद 220 धावा केल्या. गायकवाडने या झंझावाती खेळीत 10 चौकार आणि 16 षटकार मारले. सात षटकारांच्या ४२ आणि नो बॉलची १ अशा एकूण ४३ धावा त्या एका षटकात केल्या गेल्या. गायकवाडच्या या खेळीमुळे महाराष्ट्राने 50 षटकांत पाच गडी गमावून 330 धावा केल्या. गायकवाडने या डावात सलामी दिली होती. त्याच्याशिवाय महाराष्ट्राच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला अर्धशतकही करता आले नाही. या स्पर्धेतील शेवटच्या 8 डावांमधील ऋतुराजचे हे सहावे शतक आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जसह आक्रमक सलामीवीर म्हणून दमदार कामगिरी केल्यानंतर गायकवाडने गेल्या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
या वर्षाच्या सुरुवातीला, महाराष्ट्राच्या या फलंदाजाने विशाखापट्टणम येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या T20I दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक झळकावले.
हे ही वाचा: टी20 विश्वचषक 2024 होणार नव्या फॉरमॅटमध्ये
ऋतुराजला मानाच्या पंगतीत स्थान
आजच्या या विक्रमानंतर (Ruturaj Gaikwad 7 sixers in one over) ऋतुराज सर गारफिल्ड सोबर्स, रवी शास्त्री, हर्शल गिब्स, युवराज सिंग, रॉस व्हाइटली, हजरतुल्ला झाझाई, लिओ कार्टर, किरॉन पोलार्ड आणि थिसारा परेरा यांच्या पंगतीत जाऊन बसला आहे , ज्यांनी एका षटकात सलग सहा षटकार मारले आहेत.
अनेक विक्रमांना गवसणी
या झंझावाती खेळीमुळे ऋतुराजने अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याने बनविलेले रेकॉर्ड्स खालील प्रमाणे आहेत:
- आजच्या या खेळीनंतर ऋतुराज गायकवाड हा लिस्ट ए मध्ये द्विशतक करणारा पहिला महाराष्ट्राचा फलंदाज ठरला. त्याने आपली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 220* पर्यंत वाढवली आणि लिस्ट ए दुहेरी शतक नोंदवणारा 11वा भारतीय ठरला.
- ऋतुराजचे 16 षटकार हे लिस्ट ए क्रिकेटमधील भारतीयाने सर्वाधिक संयुक्तपणे रोहित शर्माच्या बरोबरीचे आहेत.
- ऋतुराजने 49 व्या षटकात 42 धावा केल्या – लिस्ट ए क्रिकेटमधील एका षटकात फलंदाजाने केलेली ही सर्वाधिक धावा आहे.
- ऋतुराज गायकवाडची सध्या जगातील सर्वोच्च लिस्ट ए सरासरी आहे (किमान ५० डाव) – ५८.७१ (६९ डावांत ३७५८ धावा).