Nine Russian banks opened special vostro accounts for trade in Rupees: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रुपयातील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सेटलमेंट सुलभ करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर रशियन बँकांनी दोन भारतीय बँकांमध्ये नऊ विशेष वोस्ट्रो खाती (Russian banks opened special vostro accounts) उघडली आहेत. त्यामुळे भारताचा रशियासोबतचा व्यापार रुपयात होण्याचा मार्ग मोकळा होईल.
आंतरराष्ट्रीय व्यापार रुपयात करण्यासाठी नवीन यंत्रणा
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार रुपयात करण्यासाठी नवीन यंत्रणा RBI ने जुलैमध्ये अधिसूचित केली होती. त्यानंतर, वाणिज्य मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित केली ज्यामुळे निर्यात डॉलरमध्ये न होता देशांतर्गत चलनात झाली तरी निर्यातदारांना विदेशी व्यापार धोरणांतर्गत निर्धारित फायदे मिळू शकतील.
रुपयातील व्यापाराला चालना देण्यासाठी भारताने नऊ बँकांसाठी ‘व्होस्ट्रो’ खाती (Russian banks opened special vostro accounts) मंजूर केली आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर, अनेक रशियन बँकांना SWIFT मेसेजिंग सिस्टम वापरण्यास बंदी घालण्यात आली ज्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी होण्यापासून रोखले गेले आहे. मॉस्कोविरुद्ध पाश्चात्य निर्बंध अधिक कठोर झाल्यास रशियाशी व्यावसायिक संबंधांना मदत करणारा उपाय म्हणून या पर्यायाकडे पाहिले जात आहे.
हे ही वाचा: या 4 गोष्टी लक्षात ठेवा सणासुदीच्या काळात घर खरेदी करताना
Russian banks opened special vostro accounts: नऊ रशियन बँकांना मंजुरी
भारताने रशियासोबत रुपयांमध्ये व्यापार सुलभ करण्यासाठी “व्होस्ट्रो” खाती उघडण्यास नऊ बँकांना मंजुरी (Russian banks opened special vostro accounts) दिली आहे, असे फेडरल ट्रेड सेक्रेटरी सुनील बर्थवाल यांनी सांगितले. भारताला रुपयात होण्याऱ्या व्यापाराला चालना द्यायची आहे, परंतु अद्याप कोणताही आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहार त्याच्या देशांतर्गत चलनात पूर्ण झालेले दिसत नाहीत.
“आम्हाला रुपयाच्या व्यापाराला चालना द्यायची आहे कारण ते देशाच्या हिताचे आहे. जिथे रुपयात व्यापार करणे शक्य आहे तिथे आम्ही उगाच डॉलर्ससाठी आग्रह धरत नाही. उलट रुपयांमध्येच व्यापार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” बर्थवाल यांनी पत्रकारांना सांगितले.
बार्थवाल म्हणाले की, “रशियाच्या गॅझप्रॉमने UCO बँकेत खाते उघडले आहे आणि VTB बँक आणि SberBank यांनी त्यांच्या स्वतःच्या भारतातील शाखा कार्यालयांमध्ये खाती उघडली आहेत. रशियन बँकांनी अजून सहा व्होस्ट्रो खाती भारताच्या इंडसइंड बँकेत देखील उघडली आहेत”.
भारताच्या मध्यवर्ती बँकेने या वर्षी जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार पूर्ण करण्यासाठी रुपयामध्ये असलेली एक नवीन यंत्रणा सादर केली, जीचा उद्देश निर्यातीला चालना देणे आणि आयात सुलभ करणे आहे.
Russian banks opened special vostro accounts: काय असतील अडचणी?
व्होस्ट्रो खाते हे असे खाते आहे जे विदेशी बँक भारतीय बँकेसोबत देशांतर्गत चलनात म्हणजे रुपयामध्ये उघडते. जेव्हा अमेरिकेने इराणवर निर्बंध लादले होते, तेव्हा भारत इराणसोबत डॉलर-मूल्यांकित व्यापार करू शकत नव्हता आणि त्यावर पर्याय म्हणून 2018 मध्ये रुपया-रियाल व्यापार यंत्रणा लागू करण्यात आली.
या अंतर्गत, भारतातील तेल शुद्धीकरण कंपन्या इराणमधून कच्च्या तेलाच्या आयातीसाठी UCO बँक आणि IDBI बँक या दोन नियुक्त बँकांमध्ये रुपये जमा करतील आणि या निधीचा वापर देशातून इराणला निर्यातदारांची देय रक्कम भरण्यासाठी केला जाईल अशी योजना होती. तथापि, पाश्चात्य निर्बंधांमुळे मे 2019 पासून भारताने इराण मधून तेलाची आयात केली नसल्यामुळे, रुपया-रियाल खात्यातील जमा मोठ्या प्रमाणात कमी होत आहे त्यामुळे अशा व्यवहारात पैसे अडकवणे हा पर्याय असू शकत नाही.
इराण ची पुनरावृत्ती रशियाबरोबरच्या व्यापारातही होईल असे भारतीय व्यापाऱ्यांना वाटते त्यामुळे या पर्यायाला पुढे कितपत यश मिळते हे येणाऱ्या दिवसांमध्ये स्पष्ट होईल.
येत्या काही महिन्यांत भारत-यूके एफटीए चर्चेची पुढील फेरी
भारत आणि यूके येत्या काही महिन्यांत प्रस्तावित मुक्त व्यापार करारासाठी चर्चेची पुढील फेरी आयोजित करतील, असे वाणिज्य सचिवांनी सांगितले. भारत आणि यूकेने जानेवारीमध्ये एफटीएसाठी औपचारिक वाटाघाटी सुरू केल्या, ज्यामध्ये शेवटी 90% पेक्षा जास्त टॅरिफ लाइन समाविष्ट होऊ शकतात. त्यांनी करारावर स्वाक्षरी करण्यासाठी दिवाळी (२४ ऑक्टोबर) ही अंतिम मुदत ठेवली होती परंतु मुख्यतः यूकेमधील राजकीय गोंधळामुळे ती चुकली.