Pushpa2 earned 60 Crores before release : पुष्पा पार्ट २ ची रीलिज आधीच ६० कोटींची कमाई

Pushpa2 earned 60 Crores before release :अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द रुल’ या चित्रपटाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत आहेत. २०२३ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये हा सर्वाधिक बहुप्रतिक्षित चित्रपट असल्याचे म्हटले जाते. हा चित्रपट १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे, परंतु आतापासूनच तो ‘पुष्पा: द राइज’ म्हणजेच पहिल्या भागापेक्षा एक पाऊल पुढे जाईल असे दिसते. काही दिवसांपूर्वीच याचा टीझर लॉन्च झाला होता. या टीझरला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. पण आता या चित्रपटाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ६० कोटींची कमाई केल्याचे म्हटले जात आहे.

Pushpa2 earned 60 Crores before release : रीलिज आधीच ६० कोटींची कमाई

भूषण कुमारची कंपनी टी-सीरीजने ‘पुष्पा 2’च्या संगीताचे हक्क विकत घेतल्याची चर्चा आहे. यासोबतच ‘पुष्पा: द रुल’ टीव्हीवर हिंदीत आणण्याचा करार यापूर्वीच करण्यात आला आहे. टीव्हीवरील वर्ल्ड प्रीमियर म्हणजेच सॅटेलाइट हक्क आणि चित्रपटाचे संगीत अधिकार मिळवून चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ६० कोटी रुपये कमावले आहेत. बॉक्स ऑफिसवर हिट होण्यापूर्वी चित्रपटाचे ओटीटी अधिकार अद्याप विकायचे बाकी आहेत. त्यामुळे या हक्कांच्या जोरावर हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी १०० कोटींची कमाई सहज करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

‘पुष्पा’ च्या संगीताची जादू

‘पुष्पा’ फ्रेंचायझीचा पहिला चित्रपट ‘पुष्पा: द राइज’ डिसेंबर २०२१ मध्ये प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट संपूर्ण भारतात हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली, तर देवी श्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही चाहत्यांच्या ओठावर आहेत. ‘सामी सामी’ आणि ‘श्रीवल्ली’ सोबतच ‘पुष्पा’ची गाणी २०२१-२०२२ मध्ये सर्वाधिक ऐकली गेली. त्यामुळे या चित्रपटाच्या सिक्वेलच्या संगीताकडून सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत.

‘पुष्पा 2’ हा चित्रपट ‘पुष्पा’पेक्षा भव्य

या चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की, ‘पुष्पा: द रुल’ त्याच्या आधीच्या चित्रपटापेक्षा भव्य आणि चांगला असेल. सुकुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर चित्रपटाची निर्मिती मायथरी मुव्ही मेकर्सच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन, फहद फासिल आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. तथापि, अद्याप संगीत अधिकार आणि सॅटेलाईट अधिकारांच्या संपादनाबाबत निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *