fbpx

लोकमान्य टिळक टर्मिनस येथेही सुरु होणार पॉड हॉटेल

रेल्वे स्थानकांवर सुरु करण्यात आलेल्या दर्जेदार पॉड हॉटेल्सची संकल्पना प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहे. मुंबई सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सुरु करण्यात आलेल्या पॉड हॉटेल्सना मिळालेला प्रतिसाद पाहून आता कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथेही एका मोठ्या पॉड हॉटेलची योजना राबवण्यात येणार आहे.

या बद्दल बोलताना मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार म्हणाले, “पॉड हॉटेल्स प्रवाशांना स्थानकांवर रात्रभर राहण्याचा आरामदायक आणि परवडणारा पर्याय देतात. कुर्ला एलटीटी येथे पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम तिकीट काउंटरजवळ आमच्याकडे मोठी जागा उपलब्ध आहे आणि तीथे पॉड हॉटेल उघडण्यात येणार आहे.”

सीएसएमटी येथील पॉड हॉटेल

सीएसएमटी येथे ३० सिंगल पॉड्स, सहा डबल पॉड्स आणि चार फॅमिली पॉड्ससह एकूण ४० पॉड्स उपलब्ध आहेत. पॉड हॉटेल पूर्णतः वातानुकूलित
असून मोबाईल चार्जिंग, लॉकर रूम, डिलक्स टॉयलेट आणि बाथरूम अशा सर्व महत्त्वाच्या सुविधा पुरवेल. पॉड्सचे बुकिंग ऑनलाइन, मोबाइल अॅपद्वारे स्टेशनवरील रिसेप्शन काउंटरवर केले जाऊ शकते. कुर्ला एलटीटी येथील पॉड हॉटेल प्रकल्प मोठा असून लवकरच तो पूर्ण होणार आहे.

पहिले पॉड हॉटेल

1979 मध्ये पहिल्यांदा जपानमध्ये पॉड किंवा कॅप्सूल हॉटेल सुरू करण्यात आले होते ज्यात अनेक लहान बेड-साईझ खोल्या तयार करण्यात आल्या होत्या. ज्यांना पारंपारिक हॉटेल्सद्वारे ऑफर केलेल्या मोठ्या, अधिक महाग खोल्यांची आवश्यकता नाही किंवा परवडत नाहीत अशा अतिथींसाठी पॉड हॉटेल्स एक स्वस्त आणि मूलभूत पर्याय आहे. वसतिगृहाप्रमाणे, पॉड हॉटेल्समध्ये टॉयलेट, शॉवर, वायरलेस इंटरनेट आणि जेवणाचे खोल्यांसारख्या अनेक सुविधा सामायिक स्वरूपात दिल्या जातात. त्यामुळे ह्या सुविधांवर येणारा खर्च कमी असतो आणि परिणामी अतिथींनाही राहण्याचा आरामदायक आणि परवडणारा पर्याय मिळतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *