fbpx

फिफा म्युझिक व्हिडिओमध्ये नोरा फतेही

जगभरातल्या फुटबॉल प्रेमींसाठी उत्सवासारखी असणारी फुटबॉलची सर्वात मोठी फिफा विश्वचषक स्पर्धा 20 नोव्हेंबरपासून सूर होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद आशियाई देश कतार करणार आहे. दरम्यान, फिफाने विश्वचषकासाठी ‘लाइट द स्काय’ अँथम रिलीज केले आहे. फिफाने हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल आणि ट्विटरवर शेअर केला आहे. या गाण्यात नोरा फतेहीही डान्स करताना दिसत आहे.

नोरा परफॉर्म करणार

नोरा FIFA च्या उद्घाटन आणि समारोप समारंभात परफॉर्म करणार आहे. यासाठी तिने करार केला असून, हा कोणत्याही कलाकारासाठी दुर्मिळ आहे. मीडियातून येणाऱ्या वृत्तांनुसार नोरा समारोप सोहळ्यात एका लोकप्रिय हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे. फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२च्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करणारी ती पहिली भारतीय व्यक्ती ठरणार आहे.

रेडऑन यांनी संगीतबद्ध केलेले गाणे

यापूर्वी शकीरा आणि जेनिफर लोपेझ यांनीही फिफा विश्वचषकात परफॉर्म केले आहे. नोरा फतेही या वर्षीच्या FIFA म्युझिक व्हिडिओमध्ये नृत्य करताना दिसली आहे. नोराने ज्या गाण्यावर परफॉर्म केले आहे ते प्रसिद्ध संगीत निर्माते रेडऑन यांनी संगीतबद्ध केले आहे. हे जगातील नामांकित रेकॉर्ड बनवणाऱ्यांपैकी एक आहेत. यापूर्वी, रेडऑनने शकीराच्या वाका वाका आणि ला ला ला सारख्या फिफा गाण्यांवर देखील काम केले आहे.

32 संघ 64 सामने खेळणार

मध्यपूर्वेतील एखादा देश फिफा विश्वचषकाचे यजमानपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ असेल. या स्पर्धेत 32 संघांचे एकूण 64 सामने होणार आहेत. जगभरातील सर्वोत्तम फुटबॉलपटू यात सहभागी होणार आहेत. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू मेस्सी आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सर्वाधिक गोल करणारा रोनाल्डोही यात खेळणार आहे. दोन्ही खेळाडूंचा हा शेवटचा विश्वचषक असू शकतो.

कतार भूषवणार यजमानपद

कतार या वर्षी फिफा विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेची ही 22 वी आवृत्ती आहे. आशिया खंडात दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धा होत आहे. यापूर्वी 2002 मध्ये जपान आणि दक्षिण कोरियाने एकत्र विश्वचषकाचे आयोजन केले होते. कतार हा विश्वचषक आयोजित करणारा सर्वात लहान देश आहे. 3 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या देशाला फिफा विश्वचषकादरम्यान 1.5 दशलक्ष प्रेक्षकांची अपेक्षा आहे.

कतारमधील 5 शहरांमध्ये एकूण 8 स्टेडियममध्ये सामने खेळवले जातील. सर्व स्टेडियम राजधानी दोहाच्या 55 ​​किलोमीटरच्या परिघात आहेत. खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम 1976 पासून कार्यरत आहे. बाकी सर्व स्टेडियम गेल्या 3 वर्षात वर्ल्ड कपसाठी बांधले गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *