fbpx

No more Unknown Number calls: फोन आल्यावर आता थेट फोन करणाऱ्याचं नाव दिसणार

No more Unknown Number calls: आपल्यापैकी प्रत्येकाला अनेक वेळा अनोळखी नंबरवरुन कॉल येत असतात.  अनेकदा आपण अनोळखी नंबरवरुन आलेले कॉल उचलतही नाही. काहींना तर अनोळखी नंबरची भीती देखील वाटते.  बऱ्याचदा टेली मार्केटिंग कंपन्या, सायबर हल्लेखोर आणि इतर अनेक अनोळखी कॉलर्सचा यांचा आपल्याला अकारण त्रास होत असतो आणि कित्येकदा नुकसानही होत असते.  या सर्व बाबींचा विचार करुन भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायकडून (TRAI) आता लवकरच एक महत्वाची सेवा सुरु केली जाणार आहे.

No more Unknown Number calls: अनोळखी नंबरपासून सुटका

ट्राय तर्फे आता लवकरच एक अशी सुविधा दिली जाणार आहे ज्यामुळे तुमची अनोळखी मोबाईल नंबरच्या त्रासापासून सुटका होणार आहे (No more Unknown Number calls). या सुविधेमळे, आता जो व्यक्ती तुम्हाला कॉल करेल त्याचं नाव तुम्हाला मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे.  तुम्ही तो नंबर सेव्ह केलेला नसला तरीही तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव दिसणार आहे.

हे ही वाचा: 1 ऑक्टोबर 2022 पासून भारतात 5G सेवा सुरु

कशी असेल ही सेवा?

या योजनेअंतर्गत आता जर एखाद्या व्यक्तीला नवीन सिमकार्ड घ्यायचे असेल तर त्यासाठी भरण्यात येणारा केवायसी (KYC) फॉर्मवर त्याला स्वत:ची सर्व खरी माहिती भरावी लागेल. शिवाय त्या फॉर्मवर सिम कार्ड वापरकर्त्याचे जे नाव असेल तेच नाव त्या व्यक्तीने इतरांना कॉल केल्यावर दिसणार आहे (No more Unknown Number calls). ट्रायच्या या उपक्रमामुळे अनेक जणांची अनोळखी नंबरमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे.

No more Unknown Number calls: आता मिळणार १०० टक्के खरी माहीती

अनोळखी नंबरवरुन आलेल्या कॉलमुळे अनेक लोकांची आर्थिक फसवणूक झाल्याची उदाहरणं आपण पाहिली आहेत. त्यामुळे आता अनोळखी नंबरवरुन लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर काही प्रमाणात आळा बसणार आहे.

अ‍ॅप्सद्वारे मिळणारी सेवा खात्रीलायक नाही

सध्या देखील काही अ‍ॅप्सचा वापर करून आपण अनोळखी नंबर कोणाचा आहे हे पाहू शकतो पण त्यांच्या सेवा सशुल्क असतात आणि महत्त्वाचं म्हणजे या अ‍ॅप्सपासूनच तुम्हाला धोका असतो.  तुमच्या मोबाईलमधील डेटा चोरी  होण्याची किंवा तुमच्या परवानगी शिवाय विकण्याची शक्यता असते.  शिवाय या अ‍ॅप्सद्वारे मिळणारी माहिती पुर्णपणे खरी असेल याचीही शाश्वती नसते. त्यामुळे आपली काही प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता असतेच. मात्र, सध्या ट्रायद्वारे केवायसी आधारित जी सेवा सुरू करण्यात येणार आहे त्याद्वारे ग्राहकांना १०० टक्के अचूक माहिती मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *