Natu Natu Song Story : बॉक्स ऑफिसवर RRR सिनेमाचा डंका वाजल्यानंतर आता ऑस्कर अवॉर्ड्समध्येही सिनेमाने बाजी मारली आहे. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सनंतर RRR सिनेमाने ऑस्करही आपल्या नावे केला आहे. ऑस्करच्या मंचावर नाटू-नाटू गाण्यावर खास परफॉर्ममन्स करण्यात आला. राहुल सिपलीगंज आणि कालभैरव यांनी या सोहळ्यात हे गाणं सादर केलं तेव्हा त्यांचा हा धमाकेदार परफॉर्मन्स पाहून डॉल्बी थिएटरमध्ये उपस्थितांनी गायक त्यांना स्टॅण्डिंग ओवेशन दिले.
‘नाटू-नाटू’ हे गाणं प्रेम रक्षित यांनी कोरियोग्राफ केलं होतं. या गाण्यामागची कहाणी त्यांनी नुकताच शेअर केली.
Natu Natu Song Story : रामचऱण आणि ज्युनियर NTR यांची एनर्जी
‘नाटू – नाटू’ या गाण्याचे कोरिओग्राफर प्रेम रक्षित यांनी सांगितलं, की हे गाणं त्यांनी एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं होतं. एकट्या कलाकालासोबत काम करणं सोपं असतं. त्याची आपली स्वत:ची स्टाइल असते. पण एकावेळी दोन कलाकारांसोबत काम करणं कठीण ठरतं. राम चरण आणि ज्युनियर NTR या दोन्ही कलाकारांची स्वतःची वेगळी स्टाईल आहे आणि या दोन वेगवेगळ्या स्टाइल असणाऱ्या कलाकारांची एनर्जी एकत्र आणणं त्यांच्यासाठी आव्हानात्मक होतं. या दोघांची एनर्जी, स्टाइल एकत्र आणत डान्सवर काम करण्यास सुरुवात केली. हे गाणं कोरियोग्राफ करण्यासाठी त्यांना तब्ब्ल दोन महिने लागले असं प्रेम रक्षित यांनी सांगितलं. या दोन्ही कलाकारांसाठी ११० मूव्स तयार केले होते. यावेळी अनेकदा नर्व्हस होत होतो, त्यावेळी राजामौली यांची साथ मिळत असल्याचंही प्रेम रक्षित यांनी सांगितलं.
Natu Natu Song Story : ऐतिहासिक ठरलं नाटू-नाटू गाणं
‘नाटू नाटू’ गाण्यामध्ये रामचऱण आणि ज्युनियर एनटीआर यांनी ज्या उर्जेनं डान्स केला आहे त्याला तोड नाही. चाहत्यांना तो डान्स कमालीचा आवडला आहे. त्यातील स्टेप्स या सोशल मीडीयावर देखील कमालीच्या लोकप्रिय झाल्या होत्या. या गाण्याच्या सिग्नेचर स्टेप्ससाठी ३० आवृत्त्या तयार केल्या. तर या गाण्यात १८ टेक घेतल्याचे युनिटने सांगितले. दरम्यान, दुसरा टेक अंतिम झाला. गाण्यात ५० बॅकग्राउंड डान्सर्स आणि सुमारे ४०० कनिष्ठ कलाकार होते. हे गाणे १० नोव्हेंबर २०२१ रोजी यूट्यूबवर रिलीज झाले असून त्याच्या हिंदी गाण्याला २६५ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर तेलुगू गाण्याला १२५ दशलक्ष आणि तामिळ गाण्याला ३९ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
गीतकार चंद्र बोस यांची निवड
संगीतकार एम.एम. कीरावानीने एका मुलाखतीत सांगितले होते की, एसएस राजमौली यांनी त्यांच्याकडून अशा गाण्याची एकदा मागणी केली होती. ज्या गाण्यामध्ये दोन्ही कलाकार एकमेकांशी स्पर्धा करताना डान्स करतील. कीरवाणीने यासाठी गीतकार चंद्र बोस यांची निवड केली. चंद्रबोस, एसएस राजामौली आणि कीरावानी यांनी १७ जून २०२० पासून या गाण्यावर काम करण्यास सुरुवात केली. महत्त्वाचे म्हणजे हे गाणे दोन दिवसांत ९० टक्के पूर्ण झाले. मात्र, हे गाणे पूर्ण व्हायला १९ महिने लागले.
हे ही वाचा: अकॅडेमी अवॉर्ड्स २०२३ मध्ये भारतीयांचा डंका
Natu Natu Song Story: युक्रेनच्या मारिंस्की पॅलेसमध्ये चित्रीकरण
२०२१ मध्ये युक्रेनची राजधानी कीव येथे असलेल्या राष्ट्रपती भवनाच्या मारिंस्की पॅलेसमध्ये या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले होते. रशिया – युक्रेन युद्धाच्या काही महिने आधीच नाटू नाटू गाण्याचं शूटिंग झालेलं. युक्रेन हे भारतीय फिल्ममेकरचे शूटिंगसाठीचे आवडते ठिकाण आहे. 2021 ला, रशिया आणि युक्रेनने कोविड-19 दरम्यान पर्यटकांसाठी आपले दरवाजे घडून शूटिंगला सुद्धा परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी RRR सिनेमाचे काही महत्त्वाचे भाग युक्रेनमध्ये शूट झाले आहेत.
गाण्याच्या शूटिंगसाठी किती दिवस लागले?
राजामौली यांनी हे गाणं माझ्यासमोर आणलं, त्यावेळी मी घाबरलो होतो. दोन सुपरस्टार एकत्र डान्स करणं मोठी गोष्ट आहे. माझ्यावर या गाण्याचं दडपण होतं, कारण दोन्ही सुपरस्टार एकमेकांपेक्षा कमी दिसू नयेत ही मोठी जबाबदारी होती. दोघांना समान दाखवणं अतिशय महत्त्वाचं होतं.
२० दिवस, ४३ रिटेक्स
हे गाणं शूट करण्यासाठी २० दिवस लागले. ४३ रिटेक्सनंतर या गाण्याचं शूटिंग पूर्ण झालं. या २० दिवसांत रिहर्सलसह गाण्याचं शूटिंगदेखील पूर्ण झालं होतं. पण हे गाणं कोरियोग्राफ करण्यासाठी दोन महिने लागल्याचं प्रेम रक्षित यांनी सांगितलं.
शेवटच्या क्षणापर्यंत या गाण्यात अनेक बदल होत होते. गाण्याच्या शेवटपर्यंत ही आपली अग्निपरीक्षा होती असंही कोरियोग्राफर प्रेम रक्षित यांनी सांगितलं. या गाण्याचं शूटिंग युक्रेनमध्ये झालं. आज ‘नाटू-नाटू’ गाण्याने ऑस्कर जिंकला असून या गाण्याच्या मेकिंगसाठी घेतलेल्या मेहनतीचं चीज झालं असल्याचंही ते म्हणाले.