fbpx

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 72वा वाढदिवस

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendr Modi) यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस (Brithday) आहे. त्यानिमित्ताने भाजपकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे 17 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जाणार आहे.

देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

या दिवशी संपूर्ण देशात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबीर तर काही ठिकाणी सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. यंदा आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात नसले तरीही त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते मोदींचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याच्या तयारीत आहेत.

कामगार-सामान्य जनतेशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून म्हणजेच 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती म्हणजेच 2 ऑक्टोबरपर्यंत भाजपचे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद साधतील. तसेच देशातील प्रत्येक जिल्ह्यात समाजसेवेशी संबंधित कार्यक्रम आयोजित केलं जाणार आहे.

सर्व बूथवर वृक्षारोपण कार्यक्रम

या ‘सेवा पंधरवडा’ दरम्यान भाजपतर्फे देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये रक्तदान शिबिरे आणि मोफत आरोग्य प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे.  तसेच देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिव्यांगांना कृत्रिम अवयव आणि उपकरणांचे वाटप करण्यात येणार आहे. सर्व जिल्ह्यातील बूथवर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

भारत 2025 पर्यंत टीबीमुक्त उद्दिष्टासोबतच भाजपचे कार्यकर्ते एक वर्षासाठी रुग्णाच्या आहार, पोषण आणि उपजीविकेच्या संबंधातही योगदान देतील.

2 दिवस स्वच्छता मोहीम 

विभागीय स्तरावर सर्व जिल्ह्यांमध्ये दोन दिवसीय स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच भाजपचे नेते देशातील सर्व जिल्ह्यांतील कोविड लसीकरण केंद्राला भेट देऊन आणि कार्यकर्ते सेवाकार्य करणार आहेत.

भाजप जनजागृती मोहीम राबवणार

जनतेशी थेट संपर्क साधण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून, भाजप देशभरात ‘जल ही जीवन’ आणि ‘स्थानिकांसाठी आवाज’ मोहिमांबद्दल तसेच भारताच्या ‘विविधतेत एकता’ आणि ‘एक भारत, श्रेष्ठ’ याविषयी जनजागृती मोहीम राबवणार आहे. देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये समाजाला ‘भारत’चा संदेश देण्यासाठी उत्सवही साजरा करणार आहे.

तामिळनाडूमध्ये युनिक सेलिब्रेशन

तामिळनाडूमध्ये मात्र थोडं हटके सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे. तामिळनाडू राज्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने १७ सप्टेंबरला जमनाला येणाऱ्या नवजात बालकांना चक्क सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे.  भाजपकडून चेन्नईतील आरएसएस रुग्णालयाची निवड केली आहे.

मत्स्य पालन आणि सूचना व प्रसारण राज्य मंत्री एल मुरुगन यांनी दिलेल्या माहिती नुसार मुख्यमंत्री एम. के स्टालिन यांच्या विधानसभेच्या कार्यक्षेत्रात पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेतर्फे ७२० किलोचे मासेही वाटले जाणार आहेत.

एकूणच नरेंद्र मोदी त्यांच्या ७२ व्या वाढदिवशी देशात नसले तरीही भाजपा तर्फे त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *