Mumbai Trans Harbour Link Project : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प लवकरच होणार पूर्ण

Mumbai Trans Harbour Link Project : शिवडी ते न्हावा शेवा, असा ओळखला जाणार मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात एमटीएचएल प्रकल्प लवकरच पूर्ण होणार असून तो प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. याची तारीख ठरली असून यामुळे आता मुंबई ते पुणे अवघ्या ९० मिनिटांत पोहोचता येणार आहे.

Mumbai Trans Harbour Link Project : देशातला सगळ्या लांब सागरी पूल

देशातल्या सगळ्या लांब सागरी पूलाचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना लवकरच हा पूल खुला होणार आहे. १६.५ किमी लांबीचा हा पूल ओपन रोड टोलिंग प्रणाली (ORT) असलेला भारतातला पहिला पूल असणार आहे. त्यामुळे मध्य मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईतील चिर्ले हा प्रवास अवघ्या १५ ते २० मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे.

प्रवाशांना लवकरच होणार उपलब्ध

पुलाच्या डेकचं काम पूर्ण झाल्यानंतर वाहनांना वाहतूकीची परवानगी देली जाईल. या पूलाची एकूण लांबी २२ किमी असणार आहे. ज्यामध्ये ५.५ किमी जमिनीवरील नाल्यांना जोडण्यात आलं आहे. तर समुद्रावरील पुलाची लांबी ही १६.५ किमी असेल. या पुलावरून दोन्ही दिशांना दररोज तब्बल ७० हजार वाहने ये-जा करतील. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

हे ही वाचा: नव्या ठाणे रेल्वे स्थानकाचा आराखडा तयार

वाहतूक कोंडी कमी होणार

लोकांची वाढती गर्दी आणि त्यामुळे रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी हा सागरी पूल तयार करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. त्यामुळे भविष्यात लोकांचा मुंबई प्रवास आणखी सुखकर होणार आहे.

भारतातील सर्वात लांब सागरी पूल

या पुलावर ६ लेन रस्ते आणि २ आतत्कालीन मार्ग आहे. जे मुंबईच्या दिशेने शिवडी आणि मुख्य भूमीवरील नवी मुंबईच्या चिर्ले ते बंदरादरम्यान पसरलेले आहेत. पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर हा असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पूल बांधण्यासाठी तब्बल १८००० कोटी रुपये खर्चण्यात आले आहेत. अधिक माहितीनुसार, जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीकडून कर्ज घेऊन हा प्रकल्प डिझाइन आणि बिल्ड करण्यात आला आहे. या डेकच्या उद्घाटनानंतर, मुंबईच्या इतर प्रकल्पांप्रमाणे एमएमआरडीए यावर लक्ष देईल ज्यात सीसीटीव्ही कॅमेरे, लॅम्पपोस्ट आणि टोल इन्फ्रास्ट्रक्चरची स्थापना केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *