fbpx

Mumbai International Airport Server Down: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व्हर डाऊन, एअरलाइन्सच्या चेक-इनवर परिणाम

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व्हर गुरुवार १ डिसेंबर २०२२ रोजी अचानक डाऊन झाला आणि सुमारे 40 मिनिटे प्रवाशांना रांगेतच खोळंबून राहावे लागले.

Mumbai International Airport Server Down: प्रवाश्यांनी व्यक्त केला राग

संगणक प्रणालीतील बिघाडामुळे (Mumbai International Airport Server Down) सर्व विमान कंपन्यांच्या चेक-इनवर परिणाम झाला. अनेक प्रवाशांनी समाज माध्यमांवर प्रतिक्रिया आणि तक्रारी देत आपला राग व्यक्त केला. सुमारे 40 मिनिटांच्या प्रयत्नानंतर सर्व्हर पुनर्संचयित करण्यात आला परंतु अचानक झालेल्या या बिघाडामुळे विमानतळावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. सुमारे 40 मिनिटे कामकाज विस्कळीत झाल्याने सर्व्हर अप झाल्यानंतरही सुमारे तास भर विमानतळावर प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

हे ही वाचा: मुंबई विमानतळ ग्रीन एनर्जी कडे

Mumbai International Airport Server Down: विमानतळाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती

मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातल्या अतिशय व्यस्त आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांकडूनही सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती देण्यात आली होती. त्याचबरोबर थोड्याच वेळात ऑपरेशन पुन्हा सुरू होईल अशी ग्वाहीही देण्यात आली.

सोशल मीडियावर प्रवाशांच्या तक्रारीवर एअर इंडियानेही उत्तर दिले आहे. एअर इंडियाने सांगितले की, “आम्हाला समजते की होणार विलंब नक्कीच गैरसोयीचा आहे. आमची टीम गैरसोय कमी करण्यासाठी काम करत आहे आणि पुढील अपडेट्ससाठी ते तुमच्या संपर्कात असतील.

सीआयएसएफने (CISF) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पदभार स्वीकारला आहे. सीआयएसएफने सांगितले की, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व्हर डाऊन (Mumbai International Airport Server Down) असल्यामुळे गर्दी सामान्यपेक्षा थोडी जास्त आहे. गर्दीचे व्यवस्थापन व्यवस्थित केले जात असून मॅन्युअल पास दिले जात असल्याने गोंधळ नाही.

केबल कट झाल्यामुळे नेटवर्कमध्ये व्यत्यय

सर्व्हर अप झाल्यानंतर कळविण्यात आले की, शहरातील काही बांधकाम कार्यादरम्यान केबल कट झाल्यामुळे नेटवर्कमध्ये व्यत्यय आला ज्यामुळे विविध तिकिट प्रणालींमध्ये व्यत्यय आला होता. सर्व यंत्रणा आता पुनर्संचयित आणि कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *