fbpx

Moto Edge 30 Ultra: 200MP कॅमेराचा जगातील पहिला स्मार्टफोन लाँच

मोटोरोला कंपनीने मोटो एज ३० अल्ट्रा (Moto Edge 30 Ultra) या नावाने एक नवीन स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच केला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात २०० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. हा फोन २०० मेगापिक्सल कॅमेरा असलेला जगातील पहिला स्मार्टफोन (World’s first 200MP Camera Phone) आहे.

कॅमेरा

या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फक्त २०० मेगापिक्सलचा रियर कॅमेराच नाही तर सेल्फीसाठी ६० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा (60MP Selfie Camera) सुद्धा दिला आहे. यामध्ये २०० मगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह ५० मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल सेंसर आणि १२ मेगापिक्सल टेलिफोटो लेंसचा समावेश आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा सॅमसंगच्या ISOCELL HP१ सेंसरसह येतो. यात ८K रिझॉल्यूशन व्हिडिओ शूट करू शकता. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी मोटोरोलाच्या या फोनमध्ये OmniVision OV60A फ्रंट कॅमेरा दिला आहे.

तगड्या प्रोसेसिंगच्या या फोनमध्ये Snapdragon 8+ Gen1 चिपसेट व पॉवर बॅकअप साठी 125W fast charging सुद्धा सपोर्ट करते. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसह येणाऱ्या या फोनमध्ये १२५ वॉट फास्ट चार्जिंगसह ४५०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोन अवघ्या ७ मिनिटात ५० टक्के आणि १९ मिनिटात फुल चार्ज होतो. यात ५० वॉट वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला आहे.

हे ही वाचा: पहिल्या इलेक्ट्रिक कारची POWERFUL झलक

किंमत (Moto Edge 30 Ultra Price)

मोटोच्या या फोनला सिंगल व्हेरियंट मध्ये आणले आहे. या स्मार्टफोनमध्ये १२ जीबी पर्यंत रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज दिले आहे. या फोनची किंमत ७२ हजार ९०० रुपये आहे. या फोनला ग्लोबल मार्केटमध्ये Starlight White आणि Interstellar Black कलर मध्ये लाँच करण्यात आले आहे.

स्पेसिफिकेशन्स (Moto Edge 30 Ultra Specs)

मोटोच्या या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले सपोर्ट करतो. या फोनमध्ये 144हर्ट्ज़ रिफ्रेश रेट दिले आहे. स्क्रीनचा गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्ट दिले आहे. ज्यात 1250निट्स ब्राइटनेस और 1500हर्ट्ज़ टच सेंपलिंग रेट सारखे फीचर्स दिले आहेत. या फोनमध्ये 4,610एमएएचची बॅटरी दिली आहे. १२५ टर्बो पॉवर चार्जिंग पॉवर सोबत ५० वॉट वायरलेस चार्जिंग व १० वॉट रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते.

या फोनला टक्कर देण्यासाठी येत्या काळात इतर कंपन्यांतर्फेही असे स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन्स लाँच करण्यात येतील यात शंका नाही. पण २०० मेगा पिक्सल कॅमेराचा पहिला फोन असल्याचा फायदा या Moto Edge 30 Ultra स्मार्टफोनला नक्की मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *