fbpx

Monthly GST revenue in India : मे महिन्यात जीएसटी संकलन 12 टक्क्यांनी वाढले

Monthly GST revenue in India : आर्थिक आघाडीवर सरकारसाठी एक आनंदाची बातमी आहे. यापूर्वी जीएडीपीचे उत्कृष्ट आकडे आले होते. आता जीएसटी संकलनाने सरकारची तिजोरी भरली आहे. जीएसटी संकलनात सातत्याने वाढ होत आहे. मे महिन्यात जीएसटी संकलन 12 टक्क्यांनी वाढले आहे.

मे महिन्यात जीएसटी संकलनात चांगली वाढ

2023 च्या मे महिन्यात भारत सरकारच्या जीएसटी संकलनात चांगली वाढ झाली आहे. वस्तू आणि सेवा कर (GST) संकलन मे महिन्यात 12 टक्क्यांच्या वाढीसह 1.57 लाख कोटी रुपये झाले. अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली. अर्थ मंत्रालयाने सांगितले की, मे महिन्यात एकूण जीएसटी महसूल 1 लाख 57 हजार 90 कोटी रुपये होता. यामध्ये केंद्रीय जीएसटी 28 हजार 411 कोटी रुपये, राज्य जीएसटी 35 हजार 828 कोटी रुपये आणि एकात्मिक जीएसटी 81 हजार 363 कोटी रुपये (माल आयातीवर गोळा केलेल्या 41 हजार 772 कोटी रुपयांसह) आणि उपकर 11 हजार 489 कोटी रुपये (माल आयातीवर जमा झालेल्या 1 हजार 57 कोटी रुपयांसह) आहे. मे 2023 चे संकलन एप्रिल 2023 च्या संकलनापेक्षा खूपच कमी आहे. एप्रिल 2023 मध्ये, जीएसटी संकलनाचा विक्रम 1.87 लाख कोटी रुपयांवर पोहोचला होता.

हे ही वाचा : लीव्ह एनकॅशमेंटची ​कर सवलत मर्यादा वाढली​

Monthly GST revenue in India : GST महसूलात 12 टक्क्याने वाढ

अर्थ मंत्रालयाने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “मे 2023 मधील महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील GST महसूल संकलनापेक्षा 12 टक्के अधिक आहे.” या कालावधीत, वस्तूंच्या आयातीवरील महसुलात 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि देशांतर्गत व्यवहारावरील महसूल (सेवांच्या आयातीसह) गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 11 टक्क्यांनी जास्त आहे. मे २०२२ मध्ये जीएसटी संकलन १.४१ लाख कोटी रुपये होते.

Monthly GST revenue in India : महाराष्ट्र नंबर वन

मे 2023 मध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक 23 हजार 536 कोटी रुपयांचे GST संकलन झाले. महाराष्ट्राने मे 2022 च्या तुलनेत 16 टक्के अधिक संकलन केले. सर्वाधिक जीएसटी संकलन करणाऱ्या राज्यांच्या यादीत कर्नाटक महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटकमध्ये 10 हजार 317 कोटी रुपये जीएसटी संकलन आले. गुजरात हे राज्य 9 हजार 800 कोटी रुपये जीएसटी संकलनासह तिसऱ्या, तामिळनाडू 8 हजार 953 कोटी रुपये जीएसटी संकलनासह चौथ्या आणि उत्तर प्रदेश 7 हजार 468 कोटी रुपये जीएसटी संकलनासह पाचव्या स्थानावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *