fbpx

Modi In Kargil: मोदींची दिवाळी कारगिलच्या जवानांसोबत

Modi In Kargil: दरवर्षी प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीही भारतीय सैनिकांबरोबर दिवाळी साजरी केली (Modi In Kargil). यंदाची दिवाळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील कारगिल द्रास येथे भारतीय सैनिकांबरोबर साजरी केली आहे. यावेळी त्यांनी सैनिकांशी संवाद साधला.

जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचे नववे वर्ष

मोदी पंतप्रधान झाल्यापासून दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचे हे त्यांचे नववे वर्ष आहे. २०१४ मध्ये प्रथमच त्यांनी सियाचीनमध्ये जवानांसह दिवाळी साजरी केली होती. तर २०१५ साली त्यांनी पंजाबमध्ये, २०१६ साली हिमाचलच्या किन्नौरमध्ये, २०१७ साली जम्मू-काश्मीर, २०१८ साली उत्तराखंड, २०१९ मध्ये राजौरी, २०२० मध्ये लोंगेवाला पोस्ट तर गेल्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय सैनिकांबरोर दिवाळी साजरी केली होती. हीच परंपरा त्यांनी यंदाही कायम ठेवली आहे.

सैनिकांना संबोधित करीत असताना मोदी म्हणाले, “सैनिकांची दिवाळी आणि आतषबाजी सर्वसामान्यांच्या दिवाळीपेशखा वेगळी असते. लष्कराची आतषबाजी वेगळी आणि स्फोटही भिन्न असतात. तुम्ही सीमेवर कवच होऊन उभे आहात आणि देशाच्या आत शत्रूंविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई होत आहे. दहशतवाद, नक्षलवाद आदींची पाळेमुळे गेल्या काही वर्षांत रुजली होती, त्याचे उच्चाटन करण्याचे प्रयत्न देश सतत करत आहे”.

ताकदीशिवाय शांतता कायम राखणे अशक्य

जवानांशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आम्ही वैश्विक शांततेचे पुरस्कर्ते आहोत. पण ताकदीशिवाय शांतता कायम राखणे शक्य नाही. भारताने नेहमीच युद्धाला सर्वात अंतिम उपाय मानले आहे. युद्ध लंकेत असो की कुरुक्षेत्रात, शेवटच्या क्षणापर्यंत टाळण्याचा प्रयत्न केला गेला”.

Modi In Kargil: तुमच्यात आल्यावर दिवाळीचा गोडवा वाढतो

पंतप्रधान मोदी जवानांना म्हणाले की, ‘माझ्यासाठी अनेक वर्षांपासून माझे कुटुंब तुम्ही सर्व आहात. माझ्या दिवाळीचा गोडवा तुमच्यात वाढतो. माझ्या दिवाळीचा प्रकाश आपल्यात आहे आणि पुढील दिवाळीपर्यंत माझे पद प्रशस्त करते. शौर्याच्या अप्रतिम गाथांसोबत आपली परंपरा, माधुर्य, गोडवाही महत्त्वाचा आहे. त्यामुळे भारत आपले सण प्रेमासोबत साजरे करतो. जगाला सहभागी करून साजरा करतो. एक सामान्य व्यक्ती म्हणून माझे कर्तव्य मला युद्धाच्या मैदानापर्यंत घेऊन आले आहे. आपण जी मदत करू शकतो, ती करण्यासाठी येथे आलो, पुण्य कमावण्यासाठी आलो.

दहशतीच्या अंताचा उत्सव

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आता दिवाळीचा अर्थ दहशतीच्या अंताचा उत्सव पंतप्रधान मोदी यांनी जवानांना संबोधित करत सांगितले की, दिवाळीचा अर्थ – दहशतीच्या अंताचा उत्सव. येथे कारगिलनेही केले होते. कारगिलमध्ये आपल्या लष्कराने दहशतवादाचा फणा चिरडला होता आणि देशात विजयाची दिवाळी साजरी केली होती, जी लोकांच्या स्मरणात आजही आहे. त्या विजयाचा मी साक्षीदार होतो याचे मला भाग्य लाभले होते. २३ वर्षांपूर्वीचे चित्र दाखवून मला त्या क्षणाची आठवण करून दिल्याबद्दल येथील अधिकाऱ्यांचे आभार मानतो”.

हे ही वाचा: विराट कोहलीच्या खेळीचे पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक

Modi In Kargil: स्वदेशी शस्त्रांच्या वापरावर भर

पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना आव्हान देत सांगितले की, आमच्याकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिल्यास आमची तीन सैन्य दले त्याच भाषेत सडेतोड उत्तर देतील. आम्ही शांततेचे दूत आहोत. मात्र, डोळ्याला डोळा भिडवत असेल तर त्यंाना पराभूत केले जाईल. पीएम मोदींनी या वेळी आत्मनिर्भर भारताचाही मंत्र दिला. त्यांनी सांगितले की, देशाच्या जवानाने स्वदेशीच्या शस्त्राचा वापर केल्यास शत्रूचा नायनाट होणे निश्चित आहे. जवानाचे धैर्य दहापट उंचावेल.

भारताच्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख करताना पीएम मोदी म्हणाले की, आज देशाची अर्थव्यवस्था दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आली आहे. एकीकडे तुम्ही सीमेवर उभे आहात, तर तुमचे तरुण मित्र नव्याने सुरुवात करत आहेत. दोन दिवसांपूर्वी इस्रोने 36 उपग्रह प्रक्षेपित करून नवा विक्रम केला आहे.

पीएम मोदी म्हणाले की, जेव्हा युक्रेनमध्ये लढा सुरू झाला तेव्हा आपला लाडका तिरंगा भारतीयांसाठी संरक्षण कवच बनला. आज जागतिक स्तरावर भारताचा मान वाढला आहे. भारताची वाढती भूमिका सर्वांसमोर आहे. भारत आपल्या बाह्य आणि अंतर्गत अशा दोन्ही शत्रूंविरुद्ध यशस्वी आघाडी घेत आहे. सीमेवर ढाल बनून उभे असाल तर देशाच्या आतही देशाच्या शत्रूंवर कडक कारवाई केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी जवांनाबरोबर ‘वंदे मातरम’ गाणंही गायलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *